धक्कादायक : औरंगाबादेत इन्शुरन्ससाठी नागरिक कोरोनाग्रस्त होत असल्याचा पालिका आयुक्तांचा खळबळजनक दावा

  • बोगस रिपोर्ट दाखवून मेडिकल इन्शुरन्स उकळतात

  • बोगस रिपोर्ट दाखवून पोलीस किंवा ईडीची चौकशी टाळली जाते.

  • विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, पॉझिटिव्ह नसताना रिपोर्ट पॉझिटिव्ह देतात. चौदा दिवस क्वॉरन्टीन करतात, पगारी रजा घेतात, तीन हजार रुपये भरुन कोरोना विमा पॉलिसीमधून निम्मे पैसे वाटून घेतात. Shocking: Municipal Commissioner’s sensational claim that citizens are getting coronary for insurance in Aurangabad

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : कोरोनाचा महास्फोट होत असताना आता एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे . बोगस कोरोना रिपोर्ट दाखवून विमा कंपन्यांना लाखो रुपयांना कसा गंडा घातला जातोय, विविध फायदे कसे उकळले जातायत, याचा गौप्यस्फोट करणारा हा खास रिपोर्ट.

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश. कोरोना नसलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं दाखवून विम्याचे लाखो रुपये उकळण्याचा गोरखधंदा राज्यात सर्रास सुरू आहे. या रिपोर्टचा वापर करून अनेक जण ठिकठिकाणी गंडा घालतायंत. कुणी विमा कंपन्यांना लुटत आहेत. तर कुणी कामावर दांड्या मारत आहेत.एकीकडे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत असल्याचे प्रशासन सांगत आहे. तोच दुसरीकडे कोरोना नसताना काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक कुठल्याही प्रकारची लक्षणे नसताना केवळ इन्शुरन्स मिळवण्यासाठी रुग्णालयात भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली असून त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच यामुळे शहराची रुग्णसंख्या रोज दीड हजाराच्या घरात जात असून विनाकारण कोरोना रुग्ण संख्या फुगीर दिसत आहे.

शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील रुग्णालयामधील कामकाजाचा आढावा घेऊन अभ्यास केला. यात कुठल्याही प्रकारची लक्षणे नसलेले व ठणठणीत असलेले रुग्ण घाटीसह खासगी रुग्णालयात दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे धनाढ्य लोक पैशांच्या जोरावर तसेच काही जण आपला लग्गा लावुन सेटींग करुन रुग्णालयात जागा मिळवत आहेत. तसेच काहीजण केवळ इन्शुरन्सचे पैसे मिळावे यासाठी खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत असा खळबळजनक खुलासा खुद्द मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह दरम्यान काल केला होता.

शहरातील नावाजलेले एमजीएम, धुत, हेडगेवार, वायएसके आदी मोठमोठ्या रुग्णालयात याविरोधात समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत डॉक्टर्स तसेच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संबंधित समिती त्या रुग्णालयांची तपासणी करेल, जर त्यात तसा असा प्रकार आढळून आला तर संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील प्रशासकांनी दिला आहे.  आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह  इन्शुरन्स मिळवण्यासाठी कोरोनाच्या नावाखाली रुग्णालयात भरती होत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच यामुळे शहरातील कोरोना आकडेवारीत कमालीची वाढ करत आहेत आणि वाढलेल्या आकडेवारी मुळे औरंंगाबाद चे नाव जगभरात बदनाम होत असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यासर्व संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांना बडतर्फ का करु नये ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Shocking : Municipal Commissioner’s sensational claim that citizens are getting coronary for insurance in Aurangabad

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*