शिवशाहीर पुरंदरेंचा मोदी, ठाकरेंच्या उपस्थितीत सत्कार l TheFocus India


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी (ता. १३) पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ पार पडला.Shivshahir Purandare felicitated in the presence of Modi, Thackeray ; TheFocus India

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात ऑनलाईन हजेरी लावली. यानिमित्ताने बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे ‘महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम व ‘शतकवीर पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्कार समारोह समितीच्या अध्यक्षा व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी सांगितले होते


मोदी, ठाकरे, अजित पवार, उदयनराजे, तेंडुलकर यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत होणार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा नागरी सत्कार


 

बाबासाहेब पुरंदरे यांनी १३ ऑगस्ट २०२१ रोजी तिथीनुसार शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यांचा नागरी सत्काराच आयोजन कोविड मर्यादांचे पालन करत मोजक्या नामवंतांच्या उपस्थितीत पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विख्यात क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी विशेष कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत शिवशाहीरांचे अभिष्टचिंतन केले.

सुमित्रा महाजन, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समारोह समितीचे सदस्य खा. विनय सहस्रबुद्धेही या गौरव समारंभात सहभागी झाले होते. दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवसृष्टीला भेट देणार आहेत.

बाबासाहेबांचा शंभरीनिमित्त सत्कार करीत असताना शिवसृष्टीचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प आहे. या संकल्पाला या कार्यक्रमामुळे बळ लाभेल, असा विश्वास सुमित्राताई महाजन यांनी व्यक्त केला.

बाबासाहेबांच्या गौरवासाठी गठित करण्यात आलेल्या सत्कार समारोह समितीच्या वतीने पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहितीही कदम यांनी दिली. हा कार्यक्रम @Shivsrushti Puneofficial या अधिकृत फेसबुक पेजवर प्रक्षेपित करण्यात आला होता.

Shivshahir Purandare felicitated in the presence of Modi, Thackeray  ;TheFocus India

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात