शिंदे गट – भाजपचा विजयाचा दावा खोटा; ग्रामपंचायत निवडणुकीवर शरद पवारांचे भाष्य


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांनी जो विजयाचा दावा केला आहे, तो खोटा असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. Shinde group – BJP’s claim of victory is false pawar statement

प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला 173 ग्रामपंचायतींमध्ये, तर काँग्रेसला 84 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले असून एकूण 285 ग्रामपंचायत या दोन्ही पक्षांनी मिळून जिंकल्या आहेत. तर शिंदे गट आणि भाजपला 210 ग्रामपंचायतीं मध्ये यश मिळाले आहे, असा दावा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला आहे.


Sharad Pawar : 124 ए राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू!!; प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला!!


ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नाहीत हजारो गावांमध्ये विविध पक्ष गट, अपक्ष, सर्वपक्षीय पॅनल अशा स्वरूपाने निवडणुका लढवल्या जातात. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत असतात. यावेळची ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांबरोबर सरपंचांची मतदारांमधून थेट निवडणूक या स्वरूपात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सरपंचांनी आपण कोणत्या पक्षाचे आहोत हे जाहीर केले की निकाल अधिक स्पष्ट होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचे म्हटले आहे, तर शरद पवारांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक ग्रामपंचायतीवर निवडून आल्याचा दावा केला आहे. पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावरच्या पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपापासून ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत सविस्तर भाष्य केले आहे.

Shinde group – BJP’s claim of victory is false pawar statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात