शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार : खात्रीशीर नावांची बातमी कुठेच नाही; पण नाराजीच्या मात्र बातम्यांचा “महापूर”!!


नाशिक : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. त्याचे वेगवेगळे आकडे फुटले आहेत. काही माध्यमांनी शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 असे मंत्री शपथ घेतील, असे सूत्रांच्या हवाल्याने जाहीर केले आहे, तर काही माध्यमांनी हा बातम्या हा आकडा 22 पर्यंत वाढवला आहे. यातली मंत्र्यांची काही नावे समान आहेत. सर्वसाधारण सूत्र एकनाथ शिंदे गटाचे जुनेच मंत्री शपथ घेतील, तर भाजप गुजरात पॅटर्न राबवून नवीन चेहऱ्यांना संधी देईल अशी चर्चा आहे.Shinde Fadnavis Cabinet Expansion : No news of sure names anywhere; But “deluge” of news of displeasure!!

पण मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी खात्रीशीर नावे कोणत्याही माध्यमाकडे नाहीत. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यापासून ते शिंदे गटाच्या संदिपान भुमरे यांच्यापर्यंत अनेकांची नावे माध्यमांमधून फिरत आहेत.



शिंदे – फडणवीस यांनी कुणाला फोन केले?, फडणवीस यांनी कुणाला स्नेहभोजन दिले?, मध्यरात्रीनंतर कोणाच्या बैठका कशा रंगल्या? याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. पण त्यापेक्षाही नाराजीच्या बातम्यांचे अधिक पेव फुटले आहे. 40 आमदार मंत्रीपदाच्या आशेने फुटले आहेत त्यातले 8 – 10 जण मंत्री होतील. बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे आहेत. आमच्या संपर्कात काही जण आहेत, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

या दाव्याच्या आणि अशा अनेक वक्तव्यांच्या आधारे माध्यमांनी नाराजीच्या बातम्यांची पेरणी केली आहे,असे वक्तव्य “अजित पवारांच्या गौप्यस्फोट”, या शीर्षकाने छापले आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात कोणा ना कोणाची नाराजी असतेच, या वक्तव्यात अजित पवारांनी नेमका काय गौप्यस्फोट केला??, हे मात्र माध्यमांच्या बातमीत कुठेही नमूद केलेले नाही. मात्र मराठवाड्यातले आमदार नाराज, ठाणे जिल्ह्यातले आमदार नाराज अशा “बळचकर बातम्या” माध्यमांनी रंगवून रंगवून दिल्या आहेत.

मंत्रिमंडळाचा विस्तार 11.00 वाजता होतो आहे. त्याच वेळी मंत्र्यांची नेमकी नावे समजणार आहेत. पण एकाही माध्यमातून सूत्रांच्या हवाल्याखेरीज कोणतीही ठोस माहिती नाही. ही मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीची सकाळी 10.00 वाजताची स्थिती आहे.

Shinde Fadnavis Cabinet Expansion : No news of sure names anywhere; But “deluge” of news of displeasure!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात