शरद पवार यूपीएचे अध्यक्ष; काँग्रेस नेत्यांनी नुसती नाराजी व्यक्त केल्याने संजय राऊत विधाने करायचे थांबतील…??

विशेष प्रतिनिधी

मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे, असे विधान करून शिवसेना खासदार संजय राऊतांनी जी राळ उडविली, त्यावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली… परंतु, काँग्रेस नेत्यांनी नुसती तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करून संजय राऊत थांबतील का, हा खरा प्रश्न आहे. sharad pawar UPA chairman; congerss leaders targets sanjay raut, but will he stop making such statements?

संजय राऊतांनी २०२१ मध्ये आतापर्यंत किमान तीनदा तरी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्यासंबंधीचे विधान केले आहे. सुरूवातीला काँग्रेसने दिल्लीतूनच नाराजी व्यक्त केल्याने स्वतः शरद पवारांनी त्याचा त्याच दिवशी सायंकाळी खुलासा करून टाकला होता… मध्यंतरी पुन्हा एकदा राऊत तसे बोलले होते. पण तो बार त्यावेळी फुसका निघाला होता.परंतु, आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा तेच विधान केल्यानंतर आणि त्यावर काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त  केल्यानंतरही शरद पवार शांतच आहेत. निदान आत्तापर्यंत तरी काही बोललेले नाहीत… याचा राजकीय अर्थ नेमका काय घ्यायचा…??

त्याच बरोबर दिल्लीतील नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर शरद पवार लगेच इन्कार करून टाकतात. पण राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंपासून प्रवक्ते सचिन सावंतांपर्यंत सगळ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत, याचा अर्थ प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना पवार किंमत देत नाहीत, असा घ्यायचा का…?? की केंद्रीय पातळीवरून काँग्रेसचा महाराष्ट्राबाबत काही वेगळा निर्णय होऊ नये म्हणून ते केंद्रीय नेत्यांच्या वक्तव्यावर खुलासा देऊन मोकळे होतात… असा अर्थ काढायचा…??

शिवसेना कधीही यूपीएची घटक नव्हती. तरीही संजय राऊत हे शरद पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची वक्तव्ये करतात. त्यांना राजकीय वस्तुस्थिती माहिती नाही का…?? तरीही ते बोलतात, याचा अर्थ काँग्रेसची उपद्रव क्षमता पुरती संपली आहे, हे ते ओळखून आहेत का…?? आणि काँग्रेसने तरी गेल्या वर्ष – सव्वा वर्षात आपले उपद्रवमूल्य कधी शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला दाखवून दिले आहे का…?? की पवार आणि राऊत त्यांना तशी किंमत द्यावी…!!

काँग्रेस नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आपल्या पाठिंब्या खरी किंमत वसूलच केलेली नाही. त्यामुळेच पवारांसारखे ज्येष्ठ नेते संजय राऊतांच्या  तोंडून आपली महत्त्वाकांक्षा वारंवार वदवून घेऊ शकतात…!! पण तरीही खरा प्रश्न पुढेच आहे, दुसऱ्याच्या तोंडून स्वतःची महत्त्वाकांक्षा वदवून घेणाऱ्या शरद पवारांना कोणी यूपीए अध्यक्ष करेल…??

sharad pawar UPA chairman; congerss leaders targets sanjay raut, but will he stop making such statements?

महत्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*