शिवसेना – राष्ट्रवादीतील दरार वाढतीय…; अँटिलिया स्फोटके प्रकरणावर राष्ट्रवादीचा भर; स्फोटके प्रकरणाला जाणून – बुजून हवा दिल्याचे राऊतांचे वक्तव्य!!

विनायक ढेरे

मुंबई :  सचिन वाझे – अनिल देशमुख खंडणीखोरी ते पोलीसांच्या बदलीचे रॅकेट इथपर्यंत महाविकास आघाडीची एक – एक पोल खुलत चाललेली असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील दरार देखील मोठी वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. किंबहुना या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर वार करायला लागलेले दिसत आहेत… अर्थात काहींना डोळे उघडून नीट बघणाऱ्यालाच दिसू शकतील…sharad pawar – sanjay raut makes contradictory statements, NCP harping antilia bomb scare case, raut says, its not important

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी कालच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना जरी इनफ इज इनफ म्हटून हटकले असले, तरी त्याचवेळी त्यांनी मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी स्फोटके कोणी ठेवली… आणि मनसुख हिरेन यांची हत्या झाली ते शोधा, ही मूळ प्रकरणे महत्त्वाची आहेत, असे वक्तव्य केले.त्याला आजच्या मुंबईच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांनीही दुजोरा दिला. अँटिलिया स्फोटक प्रकरण महत्त्वाचे आहे. त्याचा तपास झाला पाहिजे, असे वक्तव्य मलिक यांनी केले. यातली नेमकी मेख बाकी कोणाला नाही, तरी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतांना बरोबर समजली… त्यांची ही आजची वक्तव्ये पाहा…

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी आहे आणि हे सर्व भाजपमुळे झाले आहे. तिन्ही पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे. पण आम्ही हिंदुत्वाशी कुठलीही तडजोड केली नाही आणि हिंदुत्वाचा अजेंडा बदलला नाही, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

पण त्याचवेळी संजय राऊतांनी, महाराष्ट्राचे पोलीस दल मोठे आहे. त्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक या छोट्या पदावरील व्यक्ती मोहरा कसा असेल? मुकेश अंबानींच्या घरासमोर कारमध्ये आढळून आलेल्या स्फोटके प्रकरणाला जाणून – बुजून हवा दिली जात आहे, असे वक्तव्य केले.

स्फोटके प्रकरणाला हवा कोण देते आहे… हे प्रकरण मूळ आणि महत्त्वाचे आहे, असे कोण म्हणताहेत… हेच वर दिले आहे. आणि ते वक्तव्य पुरेसे बोलके आहे… म्हणूनच शिवसेना – राष्ट्रवादी यांच्यातील दरार वाढत चालल्याचा निष्कर्ष काढणे अवाजवी ठरत नाही.

sharad pawar – sanjay raut makes contradictory statements, NCP harping antilia bomb scare case, raut says, its not important

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*