१०० कोटींची खंडणीखोरी; मनसुख हिरेन हत्या तपास एनआयएकडे; महाराष्ट्रात राजकीय गदारोळ; राऊतांच्या घरी मैथिलीच्या मैफिलीत पवारांची हजेरी!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – महाराष्ट्रात हाय वोल्टेज क्राइम – पॉलिटिक्स ड्रामा घडत असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घरी मात्र भोजपुरी लोकगायिका मैथिली ठाकूरची संगीत मैफिल रंगली आहे आणि तिला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. sharad Pawar presence in Maithili concert at sanjay Raut house !!

महाराष्ट्रात सगळे सुरळित चालू आहे. १०० कोटींच्या खंडणीखोरीचे प्रकरण असो किंवा मनसुख हिरेन हत्येचा तपास महाराष्ट्र एटीएसकडून काढून घेऊन तो राष्ट्रीय तपास संस्था एनआयएकडे गेलेला असो, आमच्यात काही तस्स की मस्स झालेले नाही, हा राजकीय मेसेज दिल्लीत आणि महाराष्ट्रात देण्याचा पवार – राऊतांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.मैथिली ठाकूरच्या मैफिलीसाठी संजय राऊतांचा १५ सफदरजंग हा बंगला दिवाळी नसूनही दिवाळीसारखा सजविला आहे. पणत्या – दिव्यांच्या रोषणाईची मोठी रेलचेल आहे. शिवाय इथे डिनर डिप्लोमसी देखील रंगणार आहे.

सायंकाळपासूनच संजय राऊतांनी सोशल मीडियावर मैफिलीचे फोटो शेअर करायला सुरूवात केली आहे. त्याचबरोबर काही दिल्लीतील काही मराठी पत्रकारांनीही या मैफिलीचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत. ते संजय राऊतांनी रिट्विट केले आहेत.

sharad Pawar presence in Maithili concert at sanjay Raut house !!

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*