शरद पवारांना यूपीए अध्यक्षपद बनवायला राष्ट्रवादी काय राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे??; काँग्रेस नेत्यांनी संजय राऊतांना ठोकले

प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभेत पाच खासदारांचे संख्याबळ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष व्हावे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेतृत्वाला तिसऱ्यांदा डिवचणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊतांना काँग्रेस नेत्यांनाही आज ठोकून घेतले.sharad pawar for UPA chairman; NCP is not a national party, says hussian dalwali, targets sanjay raut

काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये समाचार घेतला. ते म्हणाले, की संजय राऊतांचे हे विधान हास्यास्पद आहे. असली विधाने करण्याची त्यांना सवय झाली आहे. ते काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना युपीएचा घटक पक्षध नाही.


असे असताना युपीएचे प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावळट चर्चा करण्याची काय गरज आहे? स्वत: शरद पवारही असे म्हणणार नाहीत. काँग्रेस हा प्रबळ पक्ष आहे. असे असताना त्याचे नेतृत्व इतर पक्षाचा कोणी नेत कसे करणार? राष्ट्रवादी काँग्रेस हा काही राष्ट्रीय पक्ष नाही.

राष्ट्रवादी महाराष्ट्रातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. महाराष्ट्रात सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून लगेच यूपीएचे अध्यक्षपद त्यांना मिळेल असे समजणे चुकीचे आहे.

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील हुसेन दलवाई यांच्या प्रतिक्रियेला दुजोरा दिला. शिवसेनेचा यूपीएशी संबंध नाही. यूपीएमधल्या घडामोडींबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, अशा शब्दांत सचिन सावंतांनी राऊतांना सुनावले.

sharad pawar for UPA chairman; NCP is not a national party, says hussian dalwali, targets sanjay raut

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*