Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital again today due to stomach ache

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात, पोटदुखीच्या असह्य त्रासामुळे 31 ऐवजी आजच झाले दाखल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना 31 मार्च रोजी दाखल केले जाणार होते, परंतु ओटीपोटात तीव्र वेदना झाल्यामुळे त्यांना रविवारीच दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या तक्रारीमुळे ते रविवारी रुग्णालयात गेले. त्या दिवसाची तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांनी 31 मार्चला दाखल करण्याचा सल्ला दिला होता. परंतु आज पुन्हा असह्य वेदनांमुळे पुन्हा ब्रीच कँडीत हलवण्यात आले आहे. Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital again today due to stomach ache


वृत्तसंस्था

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. शरद पवार यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना 31 मार्च रोजी दाखल केले जाणार होते, परंतु ओटीपोटात तीव्र वेदना झाल्यामुळे त्यांना रविवारीच दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या तक्रारीमुळे ते रविवारी रुग्णालयात गेले. त्या दिवसाची तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांनी 31 मार्चला दाखल करण्याचा सल्ला दिला होता. परंतु आज पुन्हा असह्य वेदनांमुळे पुन्हा ब्रीच कँडीत हलवण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले की, आमचे पक्षप्रमुख शरद पवार यांना बुधवारी एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार होते, पण त्यांना पुन्हा ओटीपोटात वेदना होत आहेत. यामुळे त्यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली होती. रुग्णालयात तपासणी केल्यावर त्यांच्या गॉलब्लॅडरमध्ये समस्या असल्याचे समोर आले आहे.

नवाब मलिक म्हणाले की, वैद्यकीय तपासणीत असे आढळले आहे की त्यांच्या गॉलब्लॅडरमध्ये काही समस्या आहेत. शरद पवार रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्याचे त्यांनी सांगितले, पण या पोटातील त्रासानंतर त्यांनी हे औषध बंद केले आहे. आता त्यांच्यावर एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया होणार आहेत.

Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital again today due to stomach ache

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*