गृहविभागात रक्षकच भक्षक, नाागपूर कारागृहात तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार, ५ कारागृह अधिकाऱ्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गृहखात्यात रक्षकच भक्षक बनू लागल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तृतीयपंथीय कैद्याचा  लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली कारागृहाचे पाच अधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Sexual harassment of Trangender in Nagpur jail, case filed against nine persons including 5 jail officials,


विशेष प्रतिनिधी

नागपूर : गृहखात्यात रक्षकच भक्षक बनू लागल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहात तृतीयपंथीय कैद्याचा  लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली कारागृहाचे पाच अधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सपन उर्फ उत्तम बाबा सेनापती या तृतीयपंथीयाने ही तक्रार केली आहे. या कारागृहात गेल्या दोन वर्षात तुरुंगाधिकारी, कर्मचारी आणि अट्टल गुन्हेगार यांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याचे उत्तमने केली होती. कारागृह प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्याने जिल्हा न्यायाधीश यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. या पत्राची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि कारागृह अधीक्षकांना उत्तमला तक्रार नोंदवण्यासाठी धंतोली पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश दिले.पोलीसांनी  या प्रकरणात कलम ३७७ ( अनैसर्गिक अत्याचार) आणि ३५४ (विनयभंग) नुसार वरिष्ठ तुरुंगाधिकारी कांदे, तुरुंगाधिकारी भोसले, तुरुंगाधिकारी काळपांडे, तुरुंगाधिकारी नाईक तसेच तुरुंग कर्मचारी वानखेडे आणि अन्य एक या सात जणांसह कुख्यात गुन्हेगार दर्शनसिंग कपूर आणि मुकेश यादव अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला.

 

Sexual harassment of Trangender in Nagpur jail, case filed against nine persons including 5 jail officials,

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*