सातारा : २०० हून अधिक कर्मचारी कामावर हजर ; कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरू


सातारा विभागातील २८ एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. Satara: More than २०० employees present at work; Office resumes


विशेष प्रतिनिधी

सातारा : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या पंधरा वीस दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.एसटीच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, दहिवडी, कोरेगाव, मेढा, वडूज, फलटण या ११ आगारांतील कर्मचारी संपावर गेले आहेत.

दरम्यान सातारा विभागातील २८ एसटी कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.यावेळी सातारा विभागीय कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व आगारांत तब्बल २०० हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले असल्याने कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहे.



अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की , सातारा विभागाने १८८ कर्मचाऱयांना कामावर उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, कर्मचारी नोटीस घेऊनही कामावर उपस्थित राहणार नसतील तर त्यांच्यावर महामंडळामार्फत निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

Satara : More than २०० employees present at work; Office resumes

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात