राज्यसभा निवडणूक : पराभवानंतरही राऊतांच्या तोंडी “घोडे” “हरभरे”, “घोडेबाजार” “दगाबाजी”चीच भाषा!!


नाशिक : एखाद्या निवडणुकीत पराभव झाला तर तो खिलाडी मृत्यूने स्वीकारायचा असतो. पुढच्या राजकारणाच्या दिशेने वाटचाल करायची असते. हा सर्वसाधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारलेला शिरस्ता असताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र या शिरस्त्याला फाटा देत आपली जुनीच आक्रस्ताळी भाषा कायम ठेवली आहे. राऊत यांच्या तोंडून “घोडे”, “हरभरे”, “घोडेबाजार” “दगाबाजी” हे शब्द काही हटायला तयार नाहीत. “घोडेबाजार” या शब्दावरून राज्यसभा निवडणुकीत एवढे रामायण घडून नंतर महाभारत झाले तरी संजय राऊत आक्रस्ताळेपणा करण्यात बदलायला तयार नाहीत. Sanjay Raut responded directly to the names of those who did not vote for Mahavikas Aghadi

पण हे सगळे शब्द संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांसाठी वापरले आहेत. 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनबोभाटपणे शिवसेनेच्या शब्दावर राज्यसभेत पोहोचले होते. पण 2 वर्षानंतर शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराकडे संघर्षाचे ताट नेमके कोणी वाढून ठेवले?, याविषयी मात्र संजय राऊत चकार शब्द काढायला तयार नाहीत. उलट मित्र पक्षांनी गद्दारी केली नसल्याचा निर्वाळा देत आहेत.

संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मते न देणाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. भाजपने सीबीआय, ईडीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा वापर केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

यांची मते मिळाली नाहीत

या निवडणुकीत घोडेबाजार उभे होते, त्यांची 6 – 7 मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली. हा सुद्धा आमचा विजय आहे. ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची मते आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मते दिली नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले.

आम्ही घोडेबाजार केला नाही

ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचे मत बाद केले. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र फक्त कांदेचे मत अवैध ठरवले. रवी राणादेखील जे कृत्य होते त्यांचेही मत अवैध व्हायला हवे होते, असही राऊत म्हणाले. इतर मतेही बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो डाव आम्ही हाणून पाडला असेही राऊत म्हणाले. आम्ही खबरदारी आधीही घेतली होती, आताही घेऊ, फक्त आम्ही घोडेबाजार केला नाही, असे राऊत म्हणाले.

भाजपने पैशांचा पाऊस पाडला

राऊत पुढे म्हणाले की, संजय पवार यांच्या पराभवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पराभवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार उत्तमरित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवतो, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut responded directly to the names of those who did not vote for Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात