सचिन वाझेंना परत कोणी घेतले, एनआयएने संजय राऊतांची चौकशी करावी; संजय निरूपम यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

मुंबई – सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत घेतले तर ते सरकारला अडचणीत आणतील, हे मी शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगितले होते. पण त्या मंत्र्याचे नाव मी घेणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने संजय राऊतांचा तपास करावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरूपम यांनी केली आहे. sanjay nirupam demands sanjay raut to be intoragated by NIA in sachin vaze case

जर संजय राऊत हे सचिन वाझेंना पोलीस सेवेत घेण्यास विरोधात होते. तर नेमके कोणाच्या खांद्यावरून बंदूक चालवून सचिन वाझेंना सेवेत परत घेतले, हे समजले पाहिजे. यासाठी एनआयएने संजय राऊतांची चौकशी करावी, असे ट्विट संजय निरूपम यांनी केले आहे. राऊतांसारख्या बकबक करणाऱ्या नेत्याला उचलून सचिन वाझेंच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचा, असेही निरूपम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊतांचे विधान

सचिन वाझेंना पोलीस सेवेत परत घेऊ नका. सरकार अडचणीत येऊ शकते, असे मी सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत असताना काही शिवसेना नेत्यांना इशारा देताना सांगितले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी नेमके कोणत्या शिवसेनेच्या नेत्यांना हे सांगितले होते त्यांची नावे उघड करू इच्छित नाही, असेही राऊत पुढे म्हणाले होते.

ज्या नेत्यांशी मी वाझेंबाबत बोललो होतो त्यांना त्याची जाणीव आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारला धडा मिळाला आहे. एका अर्थाने अशा प्रकारची घटना घडली ते चांगलेच झाले. कारण या प्रकरणामुळे धडा शिकायला मिळाला. कोणतीही व्यक्ती वाईट नसते. पण कधीकधी परिस्थिती तिला तसे बनवते, असेही ते म्हणाले होते.

sanjay nirupam demands sanjay raut to be intoragated by NIA in sachin vaze case

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी