मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी सचिन वाझेही हजर, एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती समोर


सचिन वाझे लादेन नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, वाझेने लादेन प्रमाणेच क्रुर कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. आपले मित्र असलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी वाझे स्वत: उपस्थित होता असे दिसून आले आहे. Sachin Wazee was also present at the time of Mansukh Hiren’s murder, in the face of shocking information in the NIA investigation


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सचिन वाझे लादेन नाही असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, वाझेने लादेन प्रमाणेच क्रुर कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. आपले मित्र असलेल्या मनसुख हिरेन यांच्या हत्येवेळी वाझे स्वत: उपस्थित होता असे दिसून आले आहे.

मनसुख हिरेन यांना कळवा खाडीच्या भागात आणल्यानंतर क्लोरोफार्मचा रूमाल त्यांच्या नाका-तोंडाजवळ जबरदस्तीने लावण्यात आला. त्यामुळे झालेल्या या झटापटीत मनसुख यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. त्यानंतर मनसुख यांना ठार मारून खाडीच्या पाण्यात टाकण्यात आले. यावेळी एकाने क्लोरोफार्म आणले होते. मनसुख यांनी प्रतिकार केल्यास त्यांना हाताळण्यासाठी इतर दोघे त्या ठिकाणी होते. वाझेही त्या ठिकाणी जवळच उभा होता असे मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलेला पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याने जबाबात सांगितल्याचे एटीएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.सचिन वाझेबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अँटेलियाजवळ स्फोटक कार ठेवण्याच्या आठवड्याभरापूर्वी वाझेने हिरेन यांना आपल्यासोबत घेऊन मर्सिडीजमधून प्रवास केला. सीएसएमटी परिसरातील त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. हिरेन यांना तो का भेटला, काय चर्चा केली आणि ते दोघे कोठे गेले होते, या कारणांचा शोध एनआयए घेत आहे.
२५ फेब्रुवारीला जिलेटिनच्या कांड्या पार्क केलेले स्कॉर्पिओ प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी म्हणजे १७ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात हिरेन आणि वाझे यांची भेट झाली होती

काळ्या रंगाची मर्सिडिज क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेला सिग्नलवर थांबली असताना हिरेन हे स्टेशनच्या बाजूने तेथे चालत येऊन मर्सिडिजमध्ये बसले. वाझे गाडी चालवित होता. तेथून यू टर्न घेऊन ही गाडी जीपीओजवळ पार्क करून दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर ते निघून जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे समोर आले.

सचिन वाझेसह सर्व संबंधित आरोपींच्या डीएनएची तपासणी करण्यात आली. जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ, दोन मर्सिडीज, इनोव्हा व्हॉल्वो आणि प्राडो गाडी एनआयएच्या ताब्यात आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक लॅबच्या टीमने नमुने घेतले आहेत. त्याचप्रमाणे अटकेत असलेले आरोपी सचिन वाझे, विनायक शिंदे, क्रिकेटबुकी नरेश गोर आणि इतर काहीजणांचे डीएनएसाठी नमुने घेण्यात आले आहेत. ते सीएफएसला पाठविले आहेत.

त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यातील साधर्म्यशी पडताळणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही बाब कैद झाली. काळ्या रंगाची मर्सिडिज क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेला सिग्नलवर थांबली असताना हिरेन हे स्टेशनच्या बाजूने तेथे चालत येऊन मर्सिडिजमध्ये बसले. वाझे गाडी चालवित होता. तेथून यू टर्न घेऊन ही गाडी जीपीओजवळ पार्क करून दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली.

Sachin Wazee was also present at the time of Mansukh Hiren’s murder, in the face of shocking information in the NIA investigation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती