सचिन वाझे प्रकरण : मुंबई-औरंगाबाद-मुंबई ; वाझेंचे औरंगाबाद कनेक्शन ‘ तेव्हाही आणि आताही ‘

  • प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण सध्या राज्यासह देशभरात गाजत आहे, या प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना NIA ने अटक केली, त्यानंतर वाझेंच्या चौकशीत विविध खुलासे समोर येत आहेत.

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवार बीकेसी परिसरात मिठी नदीच्या पात्रात शोध मोहीम राबवली. यावेळी नदी पात्रातून एक कॉम्प्यूटर, सीपीयू, दोन नंबर प्लेट्स आणि आणि अन्य साहित्य हाती लागलं . Sachin Waze case: Mumbai-Aurangabad-Mumbai; Waze’s Aurangabad connection ‘then and now’

यामुळे एनआयएच्या हाती आता या प्रकरणाशी निगडीत मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर, यावेळी सापडलेली (एमएएच-२० एफपी १५३९) ही नंबरप्लेट ही औरंगाबादमधील एका व्यक्तीच्या चोरी गेलेल्या कारची असल्याची माहिती आता समोर आली आहे.

 

एका पोलिस अधिकार्याने सांगितले की, जालना येथील सामाजिक न्याय विभागात लिपीक म्हणून काम करणारे औरंगाबाद येथील रहिवासी विजय नाडे यांना वाहनाच्या नंबर प्लेट संबंधी पत्रकारांकडून फोन येत होते, त्यानंतर ते सिटी चौक पोलिस ठाण्यात गेले. आणि त्यांनी नदीत टाकलेली नंबर प्लेट ही माझ्या चोरी झालेल्या वाहनाची आहे असे सांगितले.

२० नोव्हेंबर २०२० रोजी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल आहे, NIA सध्या तपास करत आहे की, या कारचं API सचिन वाझे कनेक्शन काय आहे, की तपास भरकटवण्यासाठी या गाडीचा उपयोग केला होता का? या प्रश्नांची उत्तरं NIA अधिकारी शोधत आहेत.

 

याबाबत विजय नाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझी कार १६ नोव्हेंबर २०२० रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी गेलेली आहे. याबाबत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मिठीनदीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे फॉरेन्सिक टीम चौकशी करत आहे, NIA च्या टीमने सचिन वाझे यांना सहआरोपी विनायक शिंदे यांच्यासोबत एकत्र बसवून चौकशी करत आहे, यापूर्वी NIA ने क्रिकेट बुकी नरेश गौंड आणि विनायक शिंदे यांची चौकशी केली, सचिन वाझे यांना ३ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

या प्रकरणात मनसुख हिरेन यांची हत्या त्याचसोबत अनेक बनावट नंबर प्लेट आढळल्याचा तपास NIA करत आहे, रविवारी या टीमने मुंबईच्या मिठी नदीतून संगणकाची हार्डडिस्क, DVR, CD आणि एका गाडीचे दोन नंबर प्लेट आणि अन्य इलेक्ट्रोनिक साहित्य बाहेर काढलं. या नंबर प्लेटवरून नवीन खुलासा समोर आला आहे.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने आपल्याविरुद्धचे पुरावे सापडू नयेत म्हणून गुन्ह्यासाठी वापरलेल्या सर्व वस्तू, दस्तऐवज मिठी नदीच्या पात्रात फेकून दिल्या होत्या. रविवारी अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी शोधमोहीम राबविली. वाझेने सांगितलेल्या परिसरात १२ पाणबुड्यांना शोध घेण्यास सांगितले

ज्या ख्वाजा युनूस प्रकरणात वाझेंना निलंबित करण्यात आलं.त्या ख्वाजा युनूस ला औरंगाबाद येथे अधिक तपासासाठी आणले जात असताना घाटात पोलीसांची गाडी उलटली आणि ख्वाजा पळून गेला असा बणाव पोलीसांनी रचला होता मात्र ख्वाजाच्या आईने नुकत्याच दिलेल्या प्रतिक्रियेत वाझेने माझ्या मुलाला मारून टाकले त्याचीच शिक्षा देव त्याला देत असल्याचे म्हंण्टले आहे.

दरम्यान आता सचिन वाझे प्रकरणात पुन्हा एकदा औरंगाबादचे नाव आले आहे. म्हणजे मुंबई-औरंगाबाद-मुंबई असे कनेक्शन परत तयार झाले आहे. हा निव्वळ योगायोग की आणखी काही सणसणीखेज खूलासे? हे लवकरच स्पष्ट होईल.

Sachin Waze case: Mumbai-Aurangabad-Mumbai; Waze’s Aurangabad connection ‘then and now’

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*