Sachin Vaze Case Assistant Inspector Riaz Qazi becomes Official witness

Sachin Vaze Case : असिस्टंट इन्स्पेक्टर रियाझ काझी बनणार माफीचे साक्षीदार, काझींना संपूर्ण कटाची माहिती

Sachin Vaze Case : पोलीस दलातील असिस्टंट इन्स्पेक्टर रियाझ काझी अँटिलिया प्रकरणात माफीचे साक्षीदार बनणार आहेत. काझी हे निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यासमवेत क्राइम इंटेलिजेंस युनिटमध्ये होते. या संपूर्ण कटाची माहिती काझी यांना होती. म्हणूनच त्यांनी माफीचे साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, एनआयएने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास कोर्टाच्या आदेशानंतर आपल्या हाती घेतला आहे. एटीएसने या प्रकरणाशी संबंधित फाइल्स औपचारिकपणे एनआयएकडे दिल्या. आता सचिन वाझे यांच्या अडचणी वाढणार हे निश्चित आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयात नेण्यास सांगितले आहे. Sachin Vaze Case Assistant Inspector Riaz Qazi becomes Official witness


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलीस दलातील असिस्टंट इन्स्पेक्टर रियाझ काझी अँटिलिया प्रकरणात माफीचे साक्षीदार बनणार आहेत. काझी हे निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यासमवेत क्राइम इंटेलिजेंस युनिटमध्ये होते. या संपूर्ण कटाची माहिती काझी यांना होती. म्हणूनच त्यांनी माफीचे साक्षीदार बनण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, एनआयएने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास कोर्टाच्या आदेशानंतर आपल्या हाती घेतला आहे. एटीएसने या प्रकरणाशी संबंधित फाइल्स औपचारिकपणे एनआयएकडे दिल्या. आता सचिन वाझे यांच्या अडचणी वाढणार हे निश्चित आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयात नेण्यास सांगितले आहे.

या याचिकेत त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सिंग यांच्या बाजूने हजर असलेले ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला देशमुख यांच्या आरोपांची निष्पक्ष सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, दीर्घकाळापर्यंत संबंधित पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल सुरू होते.

त्याचवेळी त्यांनी सिंह यांच्या वकिलांना विचारले की, त्यांनी देशमुख यांच्यावर असे बरेच आरोप केले आहेत, पण त्यांना पार्टी का बनवले नाही. यावर रोहतगी म्हणाले की, आपण या प्रकरणात देशमुख यांना पार्टी बनवणार आहोत आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा आग्रह करणार आहोत, कारण या याचिकेत अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, “या प्रकरणाचा प्रशासनावर गंभीर परिणाम होत आहे यात शंका नाही. हा एक गंभीर मुद्दा असल्याचे आम्हालाही वाटते. स्वतंत्र तपासणीसाठी तुम्हाला सूचना हव्या असतील तर उच्च न्यायालयही हे काम करू शकते. तुम्ही तिथे जायला हवे.”

सुप्रीम कोर्टाच्या एका याचिकेत सिंह यांनी देशमुखांवर खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग वा बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. रोहतगी यांनी म्हटले की, ते गुरुवारी दुपारी मुंबई हायकोर्टाच्या समोर एका त्वरित सुनावणीसाठी आवाहन करणार आहेत.

Sachin Vaze Case Assistant Inspector Riaz Qazi becomes Official witness

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*