Saamana editorial : अफजल खानाच्या फौजा म्हणून झाले, आता मोदी – शहांची हिटलरशी तुलना आणि केंद्रीय तपास यंत्रणा “नाझी फौजा”!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अफजल खानाच्या फौजा म्हणून झाले. आता सामनातून मोदी – शहांची हिटलरशी तुलना करून केंद्रीय तपास यंत्रणांची नाझी फौजा म्हणून संभावना आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील अनेक मंत्री, आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे घातले. त्यांना अटक केली. त्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हिटलरशाहीची टीका करण्यात आली आहे. त्याच बरोबर केंद्रीय तपास यंत्रणांना तपास यंत्रणांची “नाझी फौजा” अशी संभावना करण्यात आली आहे. Saamana editorial: Afzal Khan’s army, now Modi – Shah compared to Hitler and the Central Investigation Agency “Nazi army” !!

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांविरुद्ध प्रचार करताना दिल्लीतून अफजलखानाच्या फौजा सुटले आहेत असे टीकास्त्र सोडले होते केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अफजल खानासारखा पाठीत वार करू नका, अशीही तोफ डागली होती. आता सामनाच्या अग्रलेखातून मोदी आणि शहा हे हिटलर, तर ईडी आणि तपास यंत्रणांना नाझी फौजा संबोधण्यात आले आहे. केंद्रातील सरकारला हिटलर म्हणत, सामनाच्या अग्रलेखात 2024 मध्ये या हिटलरशाहीचा अंत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नवाब मलिकांना केलेल्या अटकेनंतर अग्रलेखातून ही आग ओकण्यात आली आहे.

लढत राहीन आणि जिंकेन

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येऊ नये, ही श्रींची इच्छा होती. 2024 साली केंद्रातून मोदी, शहा आणि त्यांच्या “नाझी फौजांचे” पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. महाराष्ट्रात आता एका विकृत बेहोशीत हवेत तलवारी चालवणारेही स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतवण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे. नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे! असं या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.



मलिक निर्भय आणि बेडर

नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला, तसा अंतदेखील झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी गुरुवारी सकाळी ‘ईडी’ नामक नाझी फौजा’ पोहोचल्या व 2003 सालच्या एका प्रकरणात त्यांना अटक केली. 2003 साली नवाब मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला. तो संबंध दाऊद इब्राहिमशी जोडून मलिक यांच्यावर मनी लॉण्डरिंगपासून गैरव्यवहार, टेस्र फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. 2003 च्या व्यवहारात 2013 साली आलेला मनी लॉण्डरिंगचा कायदा लागू होत नाही. तरीही भाजपच्या नाझी फौजांनी नवाब मलिक यांना अटक केली व त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मुंबईतील भाजपच्या काही लोकांनी रस्त्यावर येऊन तलवारी उपसल्या व धमक्यांची भाषणे केली. हा जल्लोष बहुधा यासाठी असावा की, मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या खोटेपणाचा रोज बुरखा फाडणा-या नवाब मलिक यांचा आवाज नाझी फौजांनी दाबला आहे.

नवाब घातक ठरतील

नवाब मलिक यांना ज्या प्रकरणात अडकवले आहे. त्याचा फैसला न्यायालयात होईल. देशातला कायदा मेलेला नाही जनता झोपलेली नाही हे उद्या कळेल. सत्य बोलणा-यांचा गळा घोटणे ही मर्दानगी नव्हे| हिंमत असेल, तर पाकिस्तानात घुसून दाऊदला खतम करा, नाहीतर फरफटत हिंदुस्थानात घेऊन या. हे लोक बार्बाडोसमधून मेहुल चोक्सी या भगोड्यास आणू शकले नाहीत. तेथे दाऊदचे कायर केंद्रीय तपास यंत्रणांना आपले गुलाम करून ते मनमानी करीत आहेत. राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहेत. महाराष्ट्रात शरद पवार व त्यांचे कुटुंब उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंब, संजय राऊत व त्यांचे कुटुंब, अनिल परब, अनिल देशमुख इत्यादींवर बदनामी व खटल्याची कैची लावून विकृत आनंद साजरा करणे हे कसले राजकारणर नवाब मलिकाचे प्रकरण मागे पडेल अशी प्रकरणे भाजप नेत्यांच्या खात्यावर जमा आहेत.

आज तलवारी नाचविणारे, खोटे आरोप करणारे भाजपचे पंटर्सही आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ‘ईडी’च्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. नवाब मलिक यांना आत टाकले, ते केव्हातरी सुटतील. ते सुटतील तेव्हा ते भाजप आणि यांच्या नाझी फौजांसाठी अधिक धोकादायक ठरतील,असे टीकास्त्र सामन्याच्या अग्रलेखातून सोडण्यात आले आहे.

Saamana editorial: Afzal Khan’s army, now Modi – Shah compared to Hitler and the Central Investigation Agency “Nazi army” !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात