विधान परिषद निवडणूक : मराठी माध्यमांचे काँग्रेसी स्टाईलचे तोकड्या बुद्धीचे रिपोर्टिंग आणि पत्ता कटची भाषा!!


विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाच्या स्ट्रॅटेजी नुसार उमेदवार ठरवले आहेत. यासाठी या पक्षांच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी आपापले पॉलिटिकल लॉजिक वापरले आहे, पण या दोन्ही बातम्यांचे रिपोर्टिंग आणि विश्लेषण करताना मराठी माध्यमांची काँग्रेसी तोकडी बुद्धी मात्र समोर आली आहे आणि तोकड्या बुद्धीतूनच “पत्ता कटची” भाषा आली आहे!! Reporting of Marathi style Congress style piecemeal intellect

– 1960च्या दशकातली भाषा

सर्वसाधारणपणे 1960 च्या दशकात काँग्रेस स्टाईलचे रिपोर्टिंग करताना नेत्यांच्या उमेदवाऱ्या कापल्या. पत्ता कट केला, अशी भाषा विकसित झाली. त्यानंतर तब्बल 60 वर्षे उलटून गेली. 2022 आले तरी मराठी माध्यमांची “पत्ता कटची” भाषा मात्र फारशी बदललेली नाही. उलट ती मराठी माध्यमांच्या बुद्धीचे तोकडेपण अधिकाधिक ठळक करताना दिसत आहे!!



– नव्या राजकीय संस्कृतीचे आकलन तोकडे

1960 नंतर भारतातले आणि महाराष्ट्रातले राजकीय प्रवाह बदलले. नवे पक्ष आले. नव्या राजकीय संस्कृती उदयाला आल्या, पण त्याचे रिफ्लेक्शन निवडणुकीच्या राजकारणाचे रिपोर्टिंग करताना विशेषतः उमेदवारी वाटपाचे रिपोर्टिंग आणि विश्लेषण करताना क्वचितच पडताना दिसते. मराठी माध्यमातले रिपोर्टिंग सर्वस्वी काँग्रेस स्टाइलच्या बुद्धीनेच होताना दिसते. काँग्रेसच्या राजकीय संस्कृती एकाला बसवणे, एकाला वर आणणे ही त्या त्या वेळच्या गरजेनुसार केलेली खेळी असायची. पण प्रत्येक राजकीय पक्ष मग तो शिवसेना अथवा भाजप आणि शिवसेना काँग्रेसच्याच पद्धतीने राजकारण करेल असे कसे होईल??या दोन्ही पक्षांची राजकीय संस्कृती काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीपेक्षा आणि कार्यपद्धतीपेक्षा भिन्न आहे. ते त्यांच्या पद्धतीने स्वतःचे राजकारण पुढे नेत असतात, याचे मराठी माध्यमांना आकलन होत नाही का??

– पंकजा मुंडे, विनोद तावडे

विधान परिषद निवडणुकीत देखील भाजपने पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची तिकिटे कापली, असा जावई शोध मराठी माध्यमांनी लावला आहे. वास्तविक पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोन्ही नेत्यांनी पक्षाकडे विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अर्ज पंकजा केला होता का?? पंकजा मुंडे यांचे एक वेळ ठीक आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणात परतण्याच्या त्या संकेत तरी देत असतात. पण विनोद तावडे यांना भाजपने हरियाणाची जबाबदारी सोपविल्यानंतर ते महाराष्ट्राकडे फिरकले देखील नाहीत. ते त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडताना दिसत आहेत. मात्र, मराठी माध्यमे स्वतःच्या कोणत्या काँग्रेस बुद्धीतून पंकजा मुंडे असो अथवा विनोद तावडे असो त्यांची राजकारणातली भूमिका आता महाराष्ट्र पलिकडची झाली आहे ते त्या दृष्टीकोनातून आपले राजकारण पुढे करणार आहे हे मराठी माध्यमांच्या लक्षातच येत नाही.

पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या महाराष्ट्र पलीकडे जाणाऱ्या व्यापक राजकारणाकडे न पाहता मराठी माध्यमे त्यांना महाराष्ट्रातच एक प्रकारे “अडकवून” ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यातूनच त्यांचे “पत्ता कटचे” रिपोर्टिंग चालू राहते.

– शिवसेनेचेही रिपोर्टिंग काँग्रेस स्टाईलने

जे भाजपच्या बाबतीत ते शिवसेनेच्या बाबतीत. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या दोन वरिष्ठ नेत्यांना शिवसेनेच्या नेतृत्वाने विधान परिषदेच्या पलिकडची कोणती जबाबदारी देण्याचे निश्चित केले असेल, त्यावर मराठी माध्यमांनी भाष्य केले नाही. उलट सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांचा “पत्ता कट” अशा स्वरूपाची भाषा वापरून रिपोर्टिंग करतात. यातून भाजप किंवा शिवसेना यांच्या राजकीय प्रणालीची अब्रू बाहेर जात नाही, तर मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींची बुद्धीचे तोकडेपण मात्र अधिकाधिक स्पष्ट दिसते. कारण त्यांचे या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत वर्तुळात सोर्स किती “मजबूत” आहेत!!, नेते किती “विश्वासार्ह” आहेत!!, हे दिसून येते.

– राजकीय नेत्यांची महत्त्वाकांक्षा एवढी माध्यम केंद्रित आहे का?

मराठी माध्यमे स्वतःच्या कोत्या बुद्धीने एखाद्या राजकीय नेत्याची महत्त्वाकांक्षा ठरवतात. आणि त्यात जणू काही आयुष्यभर बद्दलच होणार नाही, अशा थाटात त्याच महत्त्वाकांक्षेभोवती त्याचे रिपोर्टिंग फिरवत ठेवतात. यातूनच मग “पत्ता कट” सारखे बुद्धीचे तोकडेपण सिद्ध करणारे रिपोर्टिंग होत राहते. मराठी माध्यमांच्या राजकीय रिपोर्टिंगची झेप यातून महाराष्ट्रापलिकडे कधी जातच नाही!!

Reporting of Marathi style Congress style piecemeal intellect

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात