स्वाभिमान झाला जागा, राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर राजू शेट्टी यांचा अडसर

राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा देऊनही सत्तेत वाटा मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नाराजी व्यक्त करत आहेत. आता त्यांचा स्वाभिमान जागा झाला असून पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार भगिरथ भालके यांच्याविरोधात उमेदवार उभा केला आहे.Raju Shetty’s obstacle in front of NCP candidate


विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा देऊनही सत्तेत वाटा मिळत नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नाराजी व्यक्त करत आहेत. आता त्यांचा स्वाभिमान जागा झाला असून पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार भगिरथ भालके यांच्याविरोधात उमेदवार उभा केला आहे.पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार आहे. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत आज स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. माजी खासदार राजू शेट्टी स्वत: स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी दिली आहे.

राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून विधानपरिदेषची आमदारकी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी ते बारामती येथे शरद पवार यांच्या निवासस्थानीही आले होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप ही यादी मान्य केलेली नाही.

तेव्हापासूनच राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. राज्य सरकारही शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी असल्याचे दिसत नाही. त्यामुळे ते तरी कुठे आमचे आहेत, असा सवाल करत यापूर्वीही राजू शेट्टी यांनी यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता.

वाढीव वीजबिलांच्या विरोधात त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे वीजजोड तोडण्याविरोधातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते.

Raju Shetty’s obstacle in front of NCP candidate

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*