टीईटी २०१८ परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल


टीईटी २०१८ गैरव्यवहार प्रकरणत १७०० अपात्र परीक्षार्थीपैकी ८८४ जणांचे निकाल हे अंतिम निकालानंतर जाहीर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याबाबत सायबर पाेलीसांकडून न्यायालयात दाेषाराेपत्र दाखल करण्यात आले आहे. Pune cyber police filled chargsheet of TET-२०१८ exam result cheating case


विशेष, प्रतिनिधी 

पुणे : राज्यात २०१८ साली घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत शिक्षण विभागातील अधिकारी, परीक्षा आयाेजित करणारी कंपनी व एजंट यांनी तब्बल १७०१ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे पुणे सायबर पाेलीसांच्या तपासात उघडकीस आले आहे. आराेपींनी सदर १७०१ अपात्रांपैकी मुळ निकालात ८१७ जणांचे मार्क्स वाढवून त्यांना पात्र ठरवले आहे. तर, एकूण ८८४ जणांना अंतिम निकालानंतर पात्र करुन त्यांची नावे राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करुन त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची गाेष्ट चाैकशी दरम्यान समाेर आली आहे. दरम्यान पाेलीसांनी याप्रकरणी दाेन हजार६२५ पानांचे दाेषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे.

राज्य परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे (अहमदनगर), तुकाराम सुपे (पुणे), जी.ए.साॅफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक अश्विनकुमार (बँगलाेर), डाॅ.प्रितिश देशमुख (रा.पुणे,मु.रा.वर्धा),शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, एजंट संताेष हरकळ, अंकुश हरकळ (औरंगाबाद), स्वप्नील पाटील (रा.नाशिक), सुरंजीत पाटील (नाशिक), मुकुंद सुर्यवंशी (नाशिक), निखील कदम (पुणे) अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. याप्रकरणी आणखी १६ आराेपी पाहिजे असून त्यांचा शाेध घेण्यात येत आहे.



टीईटी २०१८ च्या परीक्षेत एकूण एक लाख ५७ हजार परीक्षार्थी परीक्षेस बसले हाेते. त्यापैकी नऊ हजार ६७७ जणांना टीईटी पात्र झाल्याचे निकालाद्वारे सांगण्यात येऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पाेलीस तपासात सदर पात्र करण्यात आलेल्या परीक्षार्थींपैकी ८१७ जणांचे गुण निकालापूर्वी वाढविण्यात आले. तर ८८४ जणांचे टप्पाटप्प्याने डिसेंबर २०१९ पर्यंत निकालात फेराफार करुन त्यांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आले. याकरिता आराेपींनी संगनमत करुन प्रत्येक विद्यार्थामागे ५० हजार ते अडीच लाख रुपयांपर्यत रक्कम घेतल्याचे चाैकशीत समाेर आले आहे. याप्रकरणात पाेलीसांनी एकूण १०१ साक्षीदारांचे जबाब नाेंदवले असून पाच काेटी ३७ लाखांची फसवणुक झाल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.

मराठवाडा, खानदेशात सर्वाधिक बाेगस शिक्षक

टीईटी २०१८ च्या परीक्षेत बाेगस शिक्षकांच्या यादीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे या जिल्हयातील बाेगस शिक्षकांचे प्रमाण अधिक आहे. धुळयात (२६३), नाशिक( २३६), जळगाव (२१९), नंदुरबार (२०४), ठाणे (१०२), औरंगाबाद(७०), मुंबई पश्चिम (६८), मुंबई उत्तर (८३), मुंबई दक्षिण (३०), पालघर (३४), पुणे (४२), साेलापूर, (२८), अहमदनगर (२२) सांगली (२७), जालना (१४), बीड (३७), बुलढाणा (७४), अमरावती (३५), नांदेड (१९), काेल्हापूर (१५) अशी बाेगस परीक्षार्थींची यादी पाेलीस तपासात समाेर आली आहे.

Pune cyber police filled chargsheet of TET-२०१८ exam result cheating case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात