पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा; महिलेने खंडणी मागितल्याची नगरसेवकाची तक्रार


वृत्तसंस्था

पुणे : पुण्यात नगसेवकाच्या मुलाने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात समीर बंडुतात्या गायकवाड याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तर सुनील उर्फ बंडु जयवंतराव गायकवाड यांनी महिलेने खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.Pune Corporator Son Rape Case ;Mundhwa Police Register Case agianst Sameer Gaikwad

समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा गाव) याने मुलांस आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिली व वारंवार बलात्कार केला, अशी तक्रार मुंढव्यातील ३२ वर्षाच्या महिलेने मुंढवा ठाण्यात दिली आहे.



संबंधित महिलेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. समीर गायकवाड भाजी घेण्यासाठी तिच्या घरी जात होता. दीड वर्षांपासून फिर्यादी या एकट्या असताना समीर घरी यायचा आणि मुलांना व पतीस जीवी मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. या धमकीमुळे फिर्यादीने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता.

त्यानंतर समीर गायकवाड हा फिर्यादी यांच्याशी पुन्हा जबरदस्तीने शरीरसंबंध करीत होता. त्यावेळी फिर्यादीचे पती व मुलाने हा प्रकार पाहिला. तेव्हा त्याने त्यांना मारण्याची धमकी देऊन तो निघून गेला. यानंतर आता त्यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी समीर गायकवाड याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

महिलेविरुद्ध खंडणीची तक्रार

जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा आरोप करीत नगरसेवक सुनील उर्फ बंडु जयवंतराव गायकवाड यांनी महिलेविरुध्द मुंढवा ठाण्यात गुन्हा दाखल केला. समीर हा फिर्यादी महिलेशी बोलत असताना त्याने तिचा विनयभंग केला,

असे खोटे भासवून त्याच्याविरुध्द विनयभंगाची तक्रार देण्याची आणि प्रतिष्ठेस बाधा आणण्याची भिती दाखवत संबंधित महिला तिचा पती, मुलगा व त्यांची आई, भाऊ यांनी आपल्याला जबरदस्तीने ३ लाख रुपये देण्यास भाग पाडल्याचे सुनील गायकवाड यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Pune Corporator Son Rape Case ;Mundhwa Police Register Case agianst Sameer Gaikwad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात