देवेंद्र फडणवीसांचे आरोप मुख्यमंत्री – गृहमंत्र्यांवर; पण परमवीर सिंगांपाठोपाठ आता इंटेलिजन्सच्या कमिशनर रश्मी शुक्ला राष्ट्रवादीच्या “टार्गेटवर”!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलीसांच्या बदली रॅकेटवरून अडचणीत सापडलेल्या ठाकरे – पवार सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांचे प्रत्युत्तर देताना पुरती दमछाक होते आहे… बदली रॅकेटसंदर्भात दोषींवर पांघरूण घालण्याचे काम मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केले,police trasfer – posting raket; devendra fadanavis targets uddhav thackeray, anil deshmukh, NCP targets paramavir singh, rashmi shukla

असा आरोप फडणवीसांनी केला. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीने रश्मी शुक्ला आणि परमवीर सिंगांना टार्गेट केले. तर काँग्रेसने देवेंद्र फडणवीस हे सारखी गोलपोस्ट बदलत असल्याची तक्रार आणि टीका केली. 

नबाब मलिक यांची टीका

देवेंद्र फडणवीसांना सादर केलेला फोन टॅपिंगचा अहवाल माझ्याकडे आहे. फडणवीस बदल्यांसाठी पैसे घेण्यात आले, ते या राज्याचे मुख्यमंत्री होते. गृहखाते त्यांनी सांभाळले आहे. कोणताही मंत्री थेट बदली करत नाही, त्यासाठी एक कमिटी आहे.

कोणताही मंत्री आपल्या अधिकारात या बदल्या करु शकत नाही ही सत्य परिस्थिती आहे. जे खालचे अधिकारी आहेत त्यांच्या बदल्यांसाठीदेखील समिती आहे. त्यामुळे फडणवीस दिशाभूल करत आहेत,” असा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला.

फोन टॅपिंग बेकायदेशीर होते. त्यामुळे रश्मी शुक्ला यांना नवीन पद निर्माण करून तिथे बसवण्यात आले. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सरकार तयार करत असताना सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप रश्मी शुक्ला करत होत्या, असे नवाब मलिक यांनी सांगितलं. +

सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी माझ्यावर उद्धव ठाकरेंचा दबाव होता असा दावा फडणवीसांनी केली. आपण यासाठी कायदेशीर सल्ला घेतल्याचंही ते म्हणाले. पण असा कोणताही कागद मंत्रालयात नाही. याचा अर्थ ते दिशाभूल करत होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

सचिन सावंतांची तक्रार

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी, सत्तेची हाव जात नाही म्हणून देवेंद्र फडणवीस बेछूट आरोप करत आहेत, अशी टीका केली आहे. फडणवीस हे गोलपोस्ट सारखे बदलत आहेत. फडणवीस जे काही बोलत आहेत ते ऐकीव माहितीच्या आधारे आहे. नक्की काही पुरावा नाही. कॉल इंटरसेप्शन करणे कायदेशीर नाही, त्यामुळे जे काही झाले ते कायदेशीर होते का? त्या अहवालात नक्की काही कारवाई करण्यासारखे आहे का उगाचच आरोप हो आहेत? हे सगळे बघावे लागेल,” असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

police trasfer – posting raket; devendra fadanavis targets uddhav thackeray, anil deshmukh, NCP targets paramavir singh, rashmi shukla

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*