‘प्ले बॉय’ होण्याच्या मोहात तरुणाने गमवले १७ लाख; पुण्यातील धक्कादायक घटना


पुण्यातील एका २७ वर्षीय तरुणाने चक्क ‘प्ले बॉय’ होण्याच्या नादात वडीलांच्या सेवानिवृत्तीचे तब्बल १७ लाख रुपये गमावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.वडीलांच्या सेवानिवृत्तीच पैसा ‘इंडियन एस्कार्ट सर्व्हीसच्या नादात गमावल्याने आता पश्चाताप करण्याची वेळ संबंधित तरुणावर आली आहे. Play boy attraction 27 years youth lossed 17 lakhs rupees, crime registered against three unknown persons


विशेष प्रतिनिधी

पुणे : आजची तरुणाई कुठल्या मोहाला भूलेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने चक्क ‘प्ले बॉय’ होण्याच्या नादात वडीलांच्या सेवानिवृत्तीचे तब्बल १७ लाख रुपये गमावले. या प्रकरणी दत्तवाडी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणी दयाशंकर मिश्रा, रागीणी (पूर्ण नाव माहिती नाही), विक्रम सिंग या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तवाडी परिसरात राहणा-या एका तरुणाने प्ले बॉय होण्यासाठी त्याच्या फेसबुकवर इंडियन एस्कॉर्ट सर्व्हीस कंपनीची आॅनलाईन नोंदणी करा अन एक ते दोन तासांत अडीच ते तीन हजार रुपये कमवा अशी जाहिरात पाहिली. या जाहिरातीला भुलून तरुणाने कंपनीच्या साईटवर जाऊन आॅनलाईन रजिस्ट्रेशन केले. या नंतर या तरुणास लायसन्स फी, रुम भाडे, पोलीस व्हेरीफिकेशन, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलीची रक्कम व त्याची लेट फीची मागणी अशी विविध कारणे सांगत या तरुणाला पैसे आॅनलाईल पद्धतीने एसबीआय शाखेच्या एका अकाऊंटवर भरण्यास सांगिलते.



या तरुणानेही प्ले बॉय होण्याच्या मोहात त्याच्या वडिलांच्या सेवानिवृतीची रक्कम टप्याटप्याने या खातात्यात भरली. तब्बल १७ लाख ३८ हजार ८८२ रुपयांची रक्कम भरल्यावर तरुणाने कामाचे काय झाले याची विचारणा संबंधितांना केली. मात्र, त्याला उडवा उडवीची उत्तरे दिली जाऊ लागली. तरुणाला प्ले बॉय कंपनीच्या पॉलिसीचा कुठलाही फायदा न झाल्याने त्याला आपली फसवूण झाल्याचे ध्यानात आले. त्याने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूकीमुळे तरुणाला धक्का बसला असून सध्या तो मानसिक तणावाखाली आहे.

Play boy attraction 27 years youth lossed 17 lakhs rupees, crime registered against three unknown persons

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात