पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविकेच्या मुलाचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न


पिंपरी-चिंचवड महपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. चिंचवड येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला. Pimpri-Chinchwad corporator’s son tries to commit suicide by shooting himself


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महपालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. चिंचवड येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला.

प्रसन्ना शेखर चिंचवडे (वय २१, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रसन्ना हा भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचा मुलगा आहे. प्रसन्ना याने कुटुंबियांसमवेत रविवारी रात्री जेवण केले. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. त्यानंतर गोळी झाडल्याचा आवाज आला.घरातील सदस्यांनी त्याच्या खोलीकडे धाव घेतली असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्याला उपचारासाठी त्वरित थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रसन्नाचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे. याच पिस्तुलातून त्याने गोळी झाडून घेतली आहे. मात्र गोळी झाडून घेण्याचे कारण समजू शकलेले नाही.

Pimpri-Chinchwad corporator’s son tries to commit suicide by shooting himself

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी