अनिल देशमुखांवरील १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपांची चौकशी निवृत्त न्यायाधीश चांदीवाल करणार; परमवीर प्रकरणात महाराष्ट्र सरकारकडून नियुक्ती

विशेष प्रतिनिधी

मुंबई – बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल हे करणार आहेत. ठाकरे – पवार सरकारने आज त्यांच्या चौकशी समितीच्या नियुक्तीचे आदेश काढले. येत्या सहा महिन्यांमध्ये न्या. चांदीवाल यांना सरकारला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. paramavir singh letter; justice kailas chandiwal to probe into alligations of 100 cr. extortion by home minister anil deshmukh

परमवीर सिंग यांनी मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना २० मार्च २०२१ रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांच्या खंडणीखोरीचा आरोप करणारे पत्र लिहिले होते. त्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे गृहमंत्री देशमुख यांनी किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा केल्याचे निष्पन्न होईल असा काही पुरावा परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात सादर केला आहे का याबाबत न्या. चांदीवाल यांची समिती चौकशी करेल.त्या बरोबरच सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी दिलेल्या तथाकथित माहितीच्या आधारे परमवीर सिंग यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एखादा गुन्हा केल्याचे निष्पन्न होते का याची चौकशी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे तसे असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत किंवा इतर तपास यंत्रणांमार्फत ते तपासण्याची आवश्यकता आहे का, याबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.

paramavir singh letter; justice kailas chandiwal to probe into alligations of 100 cr. extortion by home minister anil deshmukh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*