पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या, भाजपाला संघर्ष करायला शिकविला; चंद्रकात पाटील यांचे गौरवोदगार

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या आहेत. हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करायला शिकवला आहे. त्या गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. समजूतदारपणामुळेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यापासून परावृत्त केले, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. Pankaja Munde Is Wise leaders

गेल्यावर्षीपासून कोरोनाकाळात विविध पातळ्यांवर सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार बुधवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.सुरुवातीलाच पाटील यांना मुंडे यांच्या नाराजीबाबत ते म्हणाले, देशभरातून ४० जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. सर्व प्रकारचा समतोल राखताना अनेकांना संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणावर तरी अन्याय होतो. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही याबद्दल नाराजी असून शकते;

परंतु कार्यालयातून भाजप रस्त्यावर आणणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पक्ष हे आपले घर आहे आणि ते आपण सोडून जायचे नाही, या शब्दांत कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.

Pankaja Munde Is Wise leaders

महत्त्वाच्या बातम्या