Omicron variant : दक्षिण आफ्रिकेवरून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ; कुटुंबाची कोरोना तपासणी आज होणार


 

विषाणू खूपच धोकादायक आहे आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.Omicron variant: Corona positive from South Africa to Dombivli; The family’s corona will be examined today


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 असे म्हटले असून त्याला Omicron असे नाव देण्यात आले आहे. विषाणू खूपच धोकादायक आहे आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान दक्षिण आफ्रिकेवरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता वाढली होती.अशावेळी आता अजून एक चिंता वाढली ती म्हणजे डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

डोंबिवलीत केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार आहेत.या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे का, हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

दरम्यान महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की , सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार  आहे.

Omicron variant: Corona positive from South Africa to Dombivli; The family’s corona will be examined today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात