राठोडांवर काही बोलत नाहीत पण राष्ट्रवादीची पाठराखण इमानदारीने, संजय राऊत यांच्यावर प्रवीण दरेकर यांची टीका

शिवसेनेचे खासदार आणि सामना या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांचे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मधुर संबंध सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे समर्थन ते करत आहेत. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर राऊत काही बोलत नाहीत पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पाठराखण इमानदारीने करतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. Nothing is said about Rathode but honestly following the NCP, Praveen Darekar criticizes Sanjay Raut


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार आणि सामना या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांचे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मधुर संबंध सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे समर्थन ते करत आहेत. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर राऊत काही बोलत नाहीत पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची पाठराखण इमानदारीने करतात, असा टोला त्यांनी लगावला आहे.अँटिलिया प्रकरणानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याला याला मुंबईतील बारवाल्यांकडून दरमहा शंभर कोटी रुपये गोळा करण्यास त्यांनी सांगितले होते. यावरून राऊत यांच्याकडून देशमुख यांची बाजू घेतली जात आहे. त्यावर दरेकर म्हणाले, संजय राऊत यांनी केलेली वक्तव्य हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे केल्याचे दिसून येतेय. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा (संजय राठोड) घेतला जातो आणि तेव्हा संजय राऊत काहीही बोलत नाहीत. मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने केली जात आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की, राष्ट्रवादीचे?

दरेकर म्हणाले, ‘संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून केले आहे का? अशी शंका निश्चितपणे मला येते आहे. कारण ज्या वेळेला संजय राठोड त्या पक्षाचे नेते ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्या, बंजारा समाज त्या ठिकाणी शिवसेनेच्या मागे उभे केला. त्यांनी केलेले कृत्य अयोग्य आहे, त्या विषयी दुमत असण्याची काहीच कारण नाही. मात्र त्यावेळेला चौकशीसाठी राजीनामा आवश्यक वाटला, म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षाचा नेता, त्याचा राजीनामा घेण्यात येतो. तेव्हा संजय राऊत याचे वक्तव्य येत नाही, की चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणून.

तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का? मात्र त्याचवेळेला शिवसेनेच्या नेत्याची, कार्यकत्यार्ची, पाठराखण करायला विसर पडलेले संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसची भलामन पाठराखण अत्यंत इमानदारीने करताना दिसत आहेत. म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, असा निवार्ळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसतात

Nothing is said about Rathode but honestly following the NCP, Praveen Darekar criticizes Sanjay Raut

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*