Night Curfew In Maharashtra : राज्यात कोरोना संसर्गाने कहर केला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. हा धोका पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त कल्याण आणि डोंबिवलीतील सर्व दुकाने दर शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी ही बैठक राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत घेतली, ज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. ही बैठक जवळजवळ दोन तास चालली. Night curfew in Maharashtra from Sunday due to increasing corona cases, decision by CM Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाने कहर केला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. हा धोका पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त कल्याण आणि डोंबिवलीतील सर्व दुकाने दर शनिवारी व रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी ही बैठक राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत घेतली, ज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. ही बैठक जवळजवळ दोन तास चालली.
कोरोना नियंत्रित करण्याबरोबरच, पुढे लसीकरण कसे वाढवायचे? जास्तीत जास्त लोकांना लस देण्याच्या योजनेसह वैद्यकीय कर्मचार्यांच्या संख्येवरही या बैठकीत चर्चा झाली.
लॉकडाऊनची इच्छा नाही – मुख्यमंत्री
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊन लावायची इच्छा नाही, परंतु सद्य:परिस्थिती लक्षात घेता राज्यात भविष्यात आरोग्य विषयक कोणतीही समस्या सुरू होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. यासह, सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी राज्य सरकारला आरोग्य सेवेसंबंधित माहिती देत राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात किती रुग्णसंख्या?
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 35,952 रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 2,60,0,833 पर्यंत झाली आहे. मागच्या 24 तासांत 111 जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यानंतर मृतांचा आकडा 53,795 वर पोहोचला. मागच्या 24 तासांत 20,444 जण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,28,3,037 झाली आहे. आता राज्यात 2,64,001 सक्रिय रुग्ण आहेत.
Night curfew in Maharashtra from Sunday due to increasing corona cases, decision by CM Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करण्याच्या संजय राऊतांच्या स्वप्नांना नाना पटोलेंनी लावला सुरुंग, म्हणाले- सोनिया गांधीच सर्वात सक्षम!
- तृणमूलच्या कार्यालयात बॉम्बस्फोट, काँग्रेस-डाव्यांवर केला आरोप, भाजपचा पलटवार – तेथे बॉम्ब बनवणे सुरू असताना झाली घटना…
- निकीता तोमर लव्ह जिहाद हत्या प्रकरणात तौसिफ, रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा; हरियाणा सरकार फाशीच्या शिक्षेसाठी हायकोर्टात करणार अपील
- बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका : हे माझ्या जीवनातील पहिलंच आंदोलन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
- मोदींचा बांगलादेश मुक्तीसंग्राम सुवर्णजयंती समारंभात गौरव; पश्चिम बंगालमध्ये प्रचारात ममतांचे मोदींवर वैयक्तिक अश्लाघ्य हल्ले!!