नागपुरातील धक्कादायक घटना, १२वी पास फळविक्रेत्याकडून कोरोना रुग्णांवर उपचार, बनावट डॉक्टरला अशी झाली अटक

Nagpur Police Arrested Fake Doctor Treating For Covid Patient

Nagpur Police Arrested Fake Doctor : कोरोना कालावधीत फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नागपुरातही कोरोना रुग्णांवर बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. या बनावट डॉक्टरकडून ऑक्सिजन सिलिंडर आणि सिरींजही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. Nagpur Police Arrested Fake Doctor Treating For Covid Patient


विशेष प्रतिनिधी

नागपूर : कोरोना कालावधीत फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नागपुरातही कोरोना रुग्णांवर बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे. या बनावट डॉक्टरकडून ऑक्सिजन सिलिंडर आणि सिरींजही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पोलिसांच्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांवर उपचार करणारी ही व्यक्ती 12वी पास आहे. आधी फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या आरोपीने नंतर स्वत:चा दवाखानाच थाटला. चंदन नरेश चौधरी असे आरोपीचे नाव आहे. मागच्या पाच वर्षांपासून तो एक फार्मसी चालवत होता. ही घटना नागपूरच्या कामठीची आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, मागच्या पाच वर्षांपासून तो स्वत:चा दवाखाना चालवत आहे. बनावट डॉक्टर बनून त्याने असंख्य लोकांवर उपचारही केले आहेत. बनावट डॉक्टर बनण्याआधी चंदनने फळविक्रेता, इलेक्ट्रिशियन व नंतर आइस्क्रीम विक्रेता म्हणूनही व्यवसाय केले आहेत.

पाच वर्षांपासून सुरू होती फसवणूक

मागच्या पाच वर्षांपासून ओम नारायणा बहुउद्देशीय या नावाने या भामट्याने चॅरिटेबल दवाखाना सुरू केला. या दवाखान्यात आयुर्वेदिक निसर्गोपचार केला जात होता. पोलिसांनी सांगितले की, हा बनावट डॉक्टर असून त्याच्याकडे आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र नाही. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, निसर्गोपचार करणार्‍या डॉक्टरांकडून काही बनावट प्रमाणपत्रेही मिळाली आहेत. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. मागच्या 10-12 वर्षांपूर्वी नागपुरात वास्तव्यास आहे. पोलिसांनी सांगितले की, देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून त्याने कोरोना रुग्णांवरही उपचार सुरू केले होते.

Nagpur Police Arrested Fake Doctor Treating For Covid Patient

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात