मुंबईच्या डबेवाल्यांना मिळाल्या सायकली


प्रतिनिधी   

मुंबई  : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जग अडखळले. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई थबकली. कष्टकरी मुंबईची भूक भागवणाऱ्या मुंबईच्या जगप्रसिद्ध डबेवाल्यांचाही यात समावेश आहे. कोरोना साथ नियंत्रणात आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून या डबेवाल्यांचे काम पूर्ववत सुरु होऊ लागले आहे. Mumbai’s Dabewale get bicycles.

मुंबई पूर्वपदावर येत असल्याने या डबेवाल्यांना गती मिळवून देण्यासाठी एचएसबीसी बँकेने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी अंधेरी- जोगेश्वरी भागातील सुमारे अडीचशे ते तीनशे डबेवाल्यांना सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. पुढील आठवडाभरात मुंबईतील संपूर्ण डबेवाल्यांना सायकली दिल्या जाणार आहेत.



असंघटित कामगार असणाऱ्या डबेवाल्यांना कोरोना टाळेबंदीच्या काळात विविध स्वयंसेवी संस्थानी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तुंची मदत केली होती. काही दिवसांपूर्वी एचएसबीसी बँकेने मुंबई डबेवाल्यांसाठी सीएसआर फंडातून पंधरा कोटी रुपये निधी दिला.

यातूनच मुंबई डबेवाल्यांना रेशन, डबेवाल्यांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब वाटप केले गेले. याच मदतीचा पुढचा टप्पा म्हणून डबेवाल्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी सायकली आणि मोबाईल देखील दिले जाणार आहेत.

Mumbai’s Dabewale get bicycles.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात