मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरू


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुजरातच्या दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पाटील यांचे नाव मुख्य आरोपींमध्ये आहे. खेडा पाटील वजनदार आसामी असून त्यांची सखोल चौकशी होत नव्हती. मात्र भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणांना शह देण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने मुंबई पोलिसांच्या रूपाने शस्त्र परजले आहे. Mumbai police probe into Mohan Delkar suicide case

मुंबई पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने प्रफुल्ल खेडा पाटील यांच्यासह इतरही सात आरोपींचा सलग दोन दिवस जबाब लिहून घेतला. त्यामुळे तपासाला अधिक वेग मिळू शकेल. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी या कामी कारवाई सुरू केली. प्रफुल्ल खेडा पटेल गुजरातचे गृहराज्य मंत्री होते.

मोहन डेलकर यांनी आत्महत्या महाराष्ट्रातील मुंबईत येवून केली. महाराष्ट्र्रात बिगर भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे व तेच मला किमान माझ्या आत्महत्येनंतर न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. हे त्यांनी आत्महत्येपूर्वी गुजराथी भाषेत लिहिलेल्या १५ पानी सुसाईड नोटमधून स्पष्ट होते.



आत्महत्येची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मुंबई पोलिसांच्या अधिकाराखाली विशेष पथक नेमले होते. मात्र त्यांची प्रक्रिया जवळपास थांबल्यासारखीच होती. सोयराबुद्दीन मर्डर केसमध्ये अटक झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रफुल्ल खेडा – पटेल यांची गृह राज्य मंत्री पदी नियुक्ती केली. त्यानंतर ते विधानसभेची निवडणूक हरले, तरीही त्यांना दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक म्हणून नेमले. यावरून ते मोदी- शहा यांच्या किती मर्जीतले होते, ते दिसून येते.

त्यांना डेलकर यांचे मेडिकल कॉलेज हडप करायचे होते, त्यांनी आदिवासी भवनही उद्ध्वस्त केले. त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून त्रास दिला जात असे. तसे आरोप डेलकर यांनी केले आहेत. २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप या सुसाईड नोटमधून करण्यात आले. या आरोपांना त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनीही दुजोरा दिला आहे.

Mumbai police probe into Mohan Delkar suicide case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात