मुंबई पोलीसांचा सॉफ्ट खुलासा; नव्या गृहमंत्र्यांची मात्र इशाराऱ्याची भाषा


प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात राजकारणाचे तपमान वाढतेच आहे. रेमडेसिवीर साठा प्रकरणात चौकशीनाट्य आता घटना घडून गेल्यानंतर १८ तासांनी ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या वादात उडी घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. पोलीसांच्या कारवाईत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा हा इशारा वळसे पाटलांनी १८ तासांनी दिला आहे.mumbai police issued statement regarding remdisivir issue, home minister dilip valse patil warns devendra fadanavis of action

पोलीसांनी याबाबत अधिकृत पत्रक काढून खुलासा केला आहे. यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याचे नमूद नाही. त्यांनी रेमडेसिवीर बाबत एफडीएची परवानगी असल्याचे सांगितले आणि फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी का बोलावले अशी विचारणा केली, असा खुलासा पोलीसांनी केला आहे.



गृहमंत्री वळसे पाटील यांनी मात्र, याबाबत वेगळी भाषा वापरली आहे. ते म्हणाले, की पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असता,

त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का आणि कशासाठी बोलावले आहे. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात,

त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढेच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव आणणे हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.

साठ्याविषयी गृहमंत्र्यांना संशय

तसेच, “या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता.

या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे. अशी देखील माहिती आहे की केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.” अशी देखील यावेळी गृहमंत्र्यांनी माहिती दिली.

mumbai police issued statement regarding remdisivir issue, home minister dilip valse patil warns devendra fadanavis of action

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात