समृद्धी महामार्गावरून महिन्याभरात 3.50 लाखांहून अधिक वाहनांचा प्रवास; विक्रमी टोलवसुली


प्रतिनिधी

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर शिर्डी ते नागपूर सुसाट प्रवास सुरू झाला आहे. लोकार्पणानंतर या महामार्गावर विक्रमी टोलवसुली करण्यात आली आहे. आतापर्यंत 21 कोटी रुपयांच्या जवळपास टोलवसुली झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गाचे काम जवळपास 80 % पूर्ण झाले आहे. आतापर्यंत नागपूर समृद्धी महामार्गावर महिन्याभरात 3 लाख 55 हजारपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. More than 3.50 lakh vehicles travel on Samriddhi Highway in a month; Record toll collection

नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील सुसाट प्रवासासाठी वाहनचालकांना टोल द्यावा लागतो. महिन्याभरात समृद्धी महामार्गावर ३ लाख ५५ हजारपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर 21 कोटी 3 लाख रुपये टोल वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.


समृद्धी महामार्गावर फडणवीसांचे ड्रायव्हिंग; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर केली कौशल्याची वाखाणणी


 सुसाट प्रवासासाठी टोल किती?

सध्या फक्त नागपूर ते शिर्डी एवढाच रस्ता झाला असून शिर्डी ते मुंबईचे काम अद्याप सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून 1 मिनिटात 2 किलोमीटर अंतर सहजपणे पार करता येईल. औरंगाबादहून शिर्डीला एक तासात जाता येईल. एक किलोमीटर अंतरासाठी 1.73 रुपये असा टोल असेल.

आजवर देशात जे ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेस-वे झाले त्यापैकी राज्यातील समृद्धी महामार्ग सर्वात मोठा आहे. सध्या आग्रा-लखनऊ हा 301 किलोमीटर, यमुना एक्स्प्रेस-वे 165 किलोमीटर, हैदराबाद (ओआरआर) एक्स्प्रेस-वे 150 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाची मुंबई ते नागपूरपर्यंतची लांबी 701 किलोमीटर आहे. शिवाय 55 हजार कोटी रुपये हा खर्चदेखील इतर एक्स्प्रेस-वेच्या तुलनेने सर्वाधिक आहे. महामार्गासाठी संपादित एकूण 400 फूट रुंद जागेमध्ये वाहनांना धावण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 3 लेन. तब्बल 50 फूट रुंदीचे दुभाजक. रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटरच्या लांबीमध्ये एक लाख भारतीय वंशाचे वृक्ष लावले जाणार आहेत.

सध्या मुंबई ते नागपूर 812 किमीसाठी कारने 15 तास, 51 लिटर डिझेल अन् 450 रुपये टोल लागतो. समृद्धी महामार्गावरून हे अंतर 701 किलोमीटर असेल. प्रवासात 3 हॉल्ट गृहीत धरून 7 ते 8 तास लागतील. अंदाजे 39 लिटर डिझेल आणि 1212 रुपये टोल लागेल. वेळ-इंधनही वाचेल, प्रदूषणही घटेल.

More than 3.50 lakh vehicles travel on Samriddhi Highway in a month; Record toll collection

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात