COVID UPDATE: नांगरे-पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह -१०४ पोलीस रुग्णालयामध्ये दाखल ; पश्चिम रेल्वेच्या ५०० कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण


गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढतेय…. आणि याच कोरोनाच्या विळख्यात डॉक्टर, पोलीस, रेल्वे कर्मचारी, सरकारी कर्मचारी अडकलेत.Many senior officers including Nangre-Patil are positive


विशेष प्रतिनिधी

मुंबई:मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झालाय. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. आत्तापर्यंत मुंबई पोलीस दलातील ४८६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीये. त्यातील १०४ पोलिसांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय…

तिकडे पश्चिम रेल्वेच्या ५०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालीये.. यातील अनेक कर्मचाऱ्यांना सौम्य आणि अतिसौम्य लक्षणं असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. संसद भवनातही कोरोनाचा शिरकाव झालाय. ६ आणि ७ जानेवारील संसद भवनातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.  त्यामध्ये ४०० कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत… कोरोना योद्धेच कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने या लढ्यात नवं संकट उभं राहिलंय.

विश्वास नांगरे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह डझनभर वरिष्ठ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ४८६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १०४ पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे .

सीबीआयच्या ६८ कर्मचाऱ्यांना कोरोना

सीबीआयच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील कार्यालयात शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला. शनिवारी ६८ कार्यालयीन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. २३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संसद भवनात ४०० कर्मचाऱ्यांना कोरोना कोरोनाचा कहर

आता दिल्लीतील संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. संसद भवनात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. संसद भवनातील ४००हून अधिक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ६ आणि ७ जानेवारीला संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली होती, त्यामध्ये ४०० हून अधिक जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या संसर्गाचा वेगाने फैलाव होत असून बाधित होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असून पश्चिम रेल्वेकडून महालक्ष्मी येथे आयोजित करण्यात आलेल्या कोरोना चाचणी शिबिरात लोअर परळ, महालक्ष्मी कारखान्यातील ६२ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Many senior officers including Nangre-Patil are positive

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात