Mansukh Hiren Death Case NIA imposes UAPA act on Sachin Waze

Mansukh Hiren Death Case : तपास हाती येताच NIAचे मोठे पाऊल, सचिन वाझेवर लावला ‘UAPA’ कायदा

Mansukh Hiren Death Case : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ठाणे कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला मनसुख हिरेन खून प्रकरणातील चौकशी थांबवून एनआयएकडे तपास देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र एटीएसने ही केस न दिल्यामुळे एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने एटीएसला तपास थांबवण्याचे निर्देश दिले. आता तपास हातात येताच एनआयएने सचिन वाजे यांच्यावर मोठी कारवाई कर त्यांच्यावर यूएपीए (UAPA) कायदा लावला आहे. Mansukh Hiren Death Case NIA imposes UAPA act on Sachin Waze


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची (Mansukh Hiren Death Case) चौकशी करणार आहे. ठाणे कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला मनसुख हिरेन खून प्रकरणातील चौकशी थांबवून एनआयएकडे तपास देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र एटीएसने ही केस न दिल्यामुळे एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने एटीएसला तपास थांबवण्याचे निर्देश दिले. आता तपास हातात येताच एनआयएने सचिन वाजे यांच्यावर मोठी कारवाई कर त्यांच्यावर यूएपीए कायदा लावला आहे.

काय आहे यूएपीए कायदा?

यूएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत देशात आणि बाहेर अवैध कामांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 1967च्या या कायद्यात सुधारणा करून सरकारने कायदा आणखी कठोर केला आहे. हा कायदा देशभर लागू आहे. हा कायदा राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कार्यात सहभागी असलेल्या संशयिताला दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे अधिकार देतो.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन खून प्रकरणाचा एनआयएकडे सोपवला नव्हता. उल्लेखनीय बाब म्हणजे स्फोटकांनी भरलेली कार अँटिलियाच्या बाहेर पार्क केलेली आढळली होती. कारचा मालक व्यावसायिक मनसुख हिरेन होता, ज्याचा मृतदेह काही दिवसांनी सापडला.

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने दमन येथून सचिन वाझे यांची आणखी एक कार जप्त केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी सचिन वाझे यांच्या साथीदाराची असून या कारचा मालक आणि सचिन वाझे यांच्यातील कनेक्शनचा शोध घेण्यात येत आहे. सध्या ही कार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

Mansukh Hiren Death Case NIA imposes UAPA act on Sachin Vaze

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*