मधुकर पिचड यांच्यावर सुनेकडून छळाचा आणि पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप


विशेष प्रतिनिधी

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सुनेनेच छळ केल्याचेआरोप केले आहेत. पिचड यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे आपल्या पतीलाही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले,असा आरोप केला आहे.Madhukar Pichad is accused of harassing daughter in law and inciting son to commit suicide

पिचड यांच्या स्नुषा राजश्री किरण देशमुख – पिचड यांनी आपले वकिल उमेश वालझाडे यांच्यामार्फत नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजश्री यांनी म्हटले आहे की, मधुकर पिचड यांनी स्वत:च्या मुलाला देखील आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या मुलाने म्हणजेच माझ्या पतीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली.



पिचड कुटुंबीयांपासून माझ्या जिवाला धोका आहे.राजश्री म्हणाल्या की, मी 2019 मध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. पण तत्कालीन पोलीस यंत्रणेने साथ दिली नाही. फक्त महिला शाखेने अर्ज लिहून घेतला पण काहीही कारवाई झाली नाही. तक्रार दिल्यानंतर माझ्यावर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली म्हणून मी पोलीस संरक्षण देखील मागितले आहे.

सुरुवातीला माझे पतीही मला त्रास द्यायचे. त्यामुळे त्या-त्या वेळी मी त्यांच्याविरोधात देखील पोलिसात तक्रार दाखल केल्या आहेत. आमच्या पती-पत्नी दरम्यान जेव्हा भांडण होत असे तेव्हा घरातील मंडळी याबाबत माझ्या पतीला प्रोत्साहन देत असत. मला घरात मोलकरणीसारखी वागणूक देत असत. मानसिक व शारीरिक छळ करीत असत.

मला अपशब्द वापरून ते मानसिक छळ होत असे. 2015 च्या दरम्यान घरातील मंडळींनी माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्यानंतर पतीच्या मालकिची दीड कोटी रुपयांची बालाजी वेव्हरेजेस कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून व कंपनीच्या नावात बदल करून माझे सर्व हक्क संपवले. माझ्या पतीचे दागीने, पॉलिसी व ठेवी देखील काढून घेतल्या.

पोलीसांनी मधुकर काशीनाथ पिचड, जगदीश किरण देशमुख , कमलबाई मधुकरराव पिचड, सौ. अश्विनी रणजीत दरेकर, रणजीत चंद्रकांत दरेकर यांच्या विरोधात कलम 498 अ, 406, 306, 324, 504, 506, 467, 468, 471 आदी कलमांन्वये 30 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजश्री पिचड यांनी म्हटले आहे की, याविषयी कोणताही राजकीय हेतू नाही. माझ्यावर झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मी आपल्यासमोर आली आहे. दोन वषार्पूवीर्ही मी पोलिसात गेले होते पण मला तेव्हा पोलिसांकडून सहकार्य मिळालं नव्हतं. पण आता किमान एफआयआर तरी दाखल झाला आहे.

Madhukar Pichad is accused of harassing daughter in law and inciting son to commit suicide

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात