थोडं तरी खरं बोलायला शिका, चूक कबूल करून गप्प बसा, अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना सुनावले

वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात. थोडं तर खरं बोलायला शिका ! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातला म्हणजेच तुमच्याच काळातला २००५ चा विशिष्ट आदेश बघा. आता तरी चूक कबूल करुन गप बसा! अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना सुनावलं आहे.Learn to speak the truth for a while, admit the mistake and remain silent, Amrita Fadnavis told Bhai Jagtap


विशेष प्रतिनिधी

मुंबई : वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात. थोडं तर खरं बोलायला शिका ! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातला म्हणजेच तुमच्याच काळातला २००५ चा विशिष्ट आदेश बघा. आता तरी चूक कबूल करुन गप बसा! अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना सुनावलं आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पोलीस दलातील कर्मचाºयांचे सॅलरी अकाउंट्स अ‍ॅक्सिस बँकेत वळविल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर पलटवार केला.अमृता यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये 2005 सालचा म्हणजे आघाडी सरकारच्या काळातला आदेशच पुरावा म्हणून दिलाय. जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खोटे ऐकून ऐकून खराब वाटतच – हे भाई जगतापला कसे कळणार? असेही त्या म्हणाल्या आहेत.

यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत, ए भाई , तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही बॅँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचे न्हाय! असे म्हटले होते.

यावर खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, मी केवळ सवाल केला होता,अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली होती.

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचा राजीनामा घेण्यात यावा, असे म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाई जगताप यांनी टीका केली होती.

आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच अमृता फडणवीस यांनी आक्रमक होत प्रत्युत्तर दिले आहे.

Learn to speak the truth for a while, admit the mistake and remain silent, Amrita Fadnavis told Bhai Jagtap

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*