लढायला शिका, रडत बसू नका,राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला


राजू शेट्टी म्हणाले की ,कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी चप्पल घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून तर त्यांना न्याय मिळतो.Learn to fight, don’t cry, Raju Shetty advises farmers


विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद :  लोहारा तालुक्यातील माकणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी संघटनेच्यावतीने शुक्रवारी राञी आठ वाजता ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राजू शेट्टी म्हणाले की ,कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी चप्पल घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून तर त्यांना न्याय मिळतो.

उठा ,लढायला शिका, रडत बसू नका,

लक्षात ठेवा म्हणून तुम्ही पायतन हातात घ्यायला शिका काटा मोडतो म्हणूनच पायात घालायचं नाही. कधी कधी पायतनाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी सुध्दा करायचा असतो, तसा तुम्हाला आयुष्यात न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांनो उठा ,लढायला शिका, रडत बसू नका, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.



विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे

तुमचे कारखानदार तुम्हाला सात आठ महीने ऊसाचे पैसे देत नाही. हेच तुमचं दुर्दैव आहे. ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत सरकारने जो हमी भाव दिलेला आहे. त्याप्रमाणे विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे. अस कायदा सांगतो.पण नाही दिले तर त्याला १५ टक्के व्याजाची आकारणी करुन पैसे शेतकऱ्यांना द्यावे. पण हे कारखानदार वेळेवर पैसे देत नाहीत. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा असे आवाहनही शेट्टी यांनी यावेळी केले आहे.

Learn to fight, don’t cry, Raju Shetty advises farmers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात