विरोधकांमध्ये ऐक्याचा अभाव; राहुल गांधींची श्रीनगर मध्ये कबुली; लाल चौकात फडकवला तिरंगा; पण तिरंग्या पेक्षा राहुलजींची प्रतिमा उंच असल्याने ते ट्रोल!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या सांगतेच्या आदल्या दिवशी आज 29 जानेवारी 2023 रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला. मात्र तिरंगा फडकवण्याच्या जागी राहुल गांधींची प्रतिमा तिरंग्या पेक्षा उंच राहिल्याने सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. lack of unity among opponents; Rahul Gandhi’s confession in Srinagar

यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी विरोधकांमध्ये सध्या एकजुटीचा अभाव असल्याची कबुली दिली. राहुल गांधी म्हणाले, की विरोधी पक्ष सध्या विखुरलेला आहे असे म्हणणे चुकीचे आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये काही मतभेद आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण सर्व नेत्यांनी चर्चा करून एकजुटीने निवडणूक लढवली पाहिजे. आरएसएस आणि बिगर आरएसएस अशी ही वैचारिक लढाई आहे. त्यामुळे ती आरएसएस विरोधकांनी एकजुटीने लढली पाहिजे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.

त्याचवेळी त्यांनी चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारभर निशाणा देखील साधला आहे. चीनची लडाख मधली घुसखोरी आजही कायम आहे. उलट चीनकडे या परिसरातली सगळी पेट्रोलियम क्षेत्र गेली आहेत. सरकारने ही वस्तुस्थिती नाकारणे भयावह ठरेल, असा दावा राहुल गांधींनी केला आहे.

भारत जोडो यात्रेच्या समारोपात 9 पक्ष नाहीत

भारत जोडो यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. या समारोपासाठी काँग्रेसने भाजप विरोधातल्या 23 राजकीय पक्षांना निमंत्रण पाठवले आहे. मात्र, या 23 पक्षांपैकी 9 पक्ष भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला हजर राहणार नसल्याची बातमी आहे. यामध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूळ काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस अशा महत्त्वाच्या राजकीय पक्षांचा समावेश आहे. हे सर्व पक्ष उत्तर प्रदेशापासून ते तेलंगणापर्यंत सध्याचे सत्ताधारी अथवा सध्याचे मुख्य विरोधी पक्ष आहेत. या पक्षांनी काँग्रेसच्या निमंत्रणा स्वीकारलेले नाही. त्यामुळे हे पक्ष उद्याच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभाला अनुपस्थित राहणार असल्याचे या बातमीत नमूद केले आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना देखील मोठा सुरूंग लागला आहे.

lack of unity among opponents; Rahul Gandhi’s confession in Srinagar

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात