‘कर्नाटक पॅटर्न’ राबवू म्हणणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा थेट इशारा, म्हणाले ‘’इथे एकच पॅटर्न चालेल तो म्हणजे…’’


विचाराकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी सरकारसाठी, खुर्चीसाठी विचार सोडला ती शिल्लक सेना महाविकास आघाडीकडे आहे.

विशेष प्रतिनधी

पुणे :  ‘’कर्नाटकात आपला पराजय झाल्यानंतर  काही लोकांना एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, ज्यांच्या घरी मूल जन्मलाच आलं नाही, तेही असे नाचायला लागले की जणूकाही त्यांच्या घरीच मूलाचा जन्म  झाला. ज्यांचा एक माणूस तिथे निवडून आला नाही, तेही ढोल बडवत आहेत. जे निवडणुकीला उभेच राहिले नाहीत, तेही ढोल बडवत आहेत.’’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. Karnataka pattern will not work in Maharashtra here only Modi pattern BJP pattern will work  Devendra Fadnavis

पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक सुरू झाली.  याप्रसंगी  भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, या बैठकीस केंद्रीयमंत्री नारायण राणे, विनोद तावडे, विजया रहाटकर,  पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती.

‘’… पण तुमच्या मनात कुठलीही शंका ठेवू नका, कारण पोपट मेला आहे’’ देवेंद्र फडणवीसांचं विधान!

यावेळी भाषणात पुढे फडणवीस म्हणाले,  ‘’भाजपाच्या  कर्नाटकातील पराजयाची चर्चा होते, पण त्याच दिवशी देशातील सगळ्या मोठं राज्य उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने स्वत:चाच विक्रम मोडला आणि १७ महापौर थेट महापौरांच्या निवडणुकीत  निवडून आले. सगळ्या नगरपालिकांमध्ये  भाजपा निवडून  आली. पण त्याची  चर्चा झाली नाही. उत्तरप्रदेशातील यशाचं कारण भाजपाने सशक्तपणे काम केलं.’’

याशिवाय, ‘’काहीजण म्हणतात आता कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ पैकी २५  जागा आपण निवडून येऊ.  पण तरी जे  लोक म्हणत आहेत, कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, त्यांना एवढंच सांगतो. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार करत असाल, की केवळ अल्पसंख्यांकाचं ध्रुवीकरण करून, या महाराष्ट्रात तुम्हाला निवडून येता येईल, तर हे शक्य होणार नाही. कारण, या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी एकएक मावळा जो तयार केलेला आहे, त्याला देव-देश अन् धर्मासाठी कसं लढायचं हे माहीत आहे. त्यामुळे निश्चितपणे या लढाईत तो भाजपाचा मावळा, हे दाखवून देईल की तुम्ही कितीही तुष्टीकरण करा, तुम्ही कितीही लांगुलचालन करा, पण कुठलाच कर्नाटक पॅटर्न तुम्हाला आणता येणार नाही. इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न, इथे एकच पॅटर्न चालेल भाजपा पॅटर्न, इथे एकच पॅटर्न चालेल छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. दुसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही.’’ असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

याचबरोबर, ‘’आता हे तिघे एकत्रित येतोय असं म्हणत आहेत, पण आज भाजपा आणि शिवसेनेची जी युती आहे, ही अतिशय भक्कम आहे. ज्या शिवसेनेने विचाराकरता सरकार सोडलं. कारण, एकनाथ शिंदे तर सरकारमध्ये होते. विचाराकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी सरकारसाठी विचार सोडला, ज्यांनी खुर्चीसाठी विचार सोडला ती शिल्लक सेना आता फक्त महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे, की  येत्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा कुठल्याही परिस्थितीत, मग ती महापालिका, जिल्हापरिषद किंवा लोकसभा व विधानसभा असो तिथे निवडून येणार.’’ असं फडणवीसांनी विधान केलं.

तसेच ‘’फिर चिखते फिर रहे बदहवा चेहरे, फिर रचे जा रहे है षडयंत्र गहरे…पण या सगळ्या षडयंत्राला आपलं उत्तर काय आहे, ‘’न उनकी रस्म नई है, न अपनी रीत नई… यूही हमेशा खिलाए है, हमने आग मै फूल न उनकी हार नई है न अपनी जीत नई…’’ त्यामुळे आपण जिंकणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका असणाचं कारण नाही.’’ असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली.

Karnataka pattern will not work in Maharashtra here only Modi pattern BJP pattern will work  Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात