“घाटाचा राजा” सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे पिंपरी – चिंचवडमधील रुग्णालयांच्या अनास्थेमुळे निधन; कुटुंबीयांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

पुणे – शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू आणि “घाटाचा राजा” अशी ओळख असलेले सायकलपटू, प्रशिक्षक कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन झाले. त्यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना दाखल करण्यासाठी दोन रुग्णालयांमध्ये नेण्यात आले होते. पण दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार न दिल्याने त्यांचे निधन झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे. kamalakar zende passed away due to rejection of two hospitals in PCMC to admit him

इंडियन एक्स्प्रेसने याची बातमी दिली आहे. कमलाकर झेंडे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना कुटुंबीयांनी दोन खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी त्यांना दाखल करून घेण्यास मनाई केली. असे कमलाकर यांचा मुलगा प्रशांत यांनी म्हटले आहे. (maharashtra lockdown 2021)

तुम्ही त्यांची आधी कोव्हिड १९ टेस्ट करायला पहिल्या रुग्णालयाने सांगितले. पण तेव्हा रात्रीचे ११.०० वाजले होते. एवढ्या रात्री आम्ही कुठे टेस्ट करायचा प्रश्न कुटुंबीयांना पडला होता.

दुसरे म्हणजे डी.वाय.पाटील रुग्णालय! तेथील डॉक्टरतर वडिलांना तपासायलादेखील तयार नव्हते. तेथे बेसिक ट्रिटमेंटसुद्धा देण्यात आली नाही’. ते म्हटले की, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे. त्यांचा कोविड रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्यांना दाखल करता येणार नाही.



साधारण रात्री १.०० वाजता कुटुंबीयांनी YCMH या पिंपरी-चिंचवड पालिकेच्या रुग्णालयात धाव घेतली. तेथील डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिला. परंतु, म्हटले की, कोव्हिड टेस्ट रिपोर्टनुसार सकाळी उपचार सुरू करू. साधारण ३.०० वाजता, प्रशांत यांना YCMH रुग्णालयातून कॉल आला. त्यांनी सांगितले की, ‘तुमच्या वडिलांची तब्बेत आणखी खालावली आहे. तुम्ही त्यांना परत न्या किंवा इतर रुग्णालयात दाखल करा. प्रशांत यांनी तत्काळ ओळखीच्या माजी नगरसेवकाला फोन केला. त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी बातचीत केली. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना तेथेच ठेवत काळजी आणि उपचार देण्याचे आश्वासन दिले.

सकाळी कुटुंब त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. तेव्हा ते ठीक दिसत होते. त्यांनी कपभर चहाही मागितली. परंतु अचानक त्यांची हालचाल बंद झाली. कुटूंबियांनी डॉक्टरांना याची माहिती दिली. डॉक्टरांनी त्यांना तपासले ईसीजी केली. तोपर्यंत कमलाकर यांनी प्राण सोडला होता.

प्रशांत म्हणतात की, ‘त्यांच्या वडिलांचे निधन अपुऱ्या उपचाराअभावी झाले आहे. दोन रुग्णालयांनी त्यांना दाखल केले नाही. तिसऱ्याने योग्य उपचार दिले नाही. प्रत्येकजण कोविड रिपोर्ट मागत होते. रिपोर्टचा हट्ट धरण्याआधी रुग्णालयांनी प्राथमिक उपचार केले असते. तर माझे वडील वाचले असते. वडिलांच्या निधनासाठी त्यांनी अक्षम आरोग्य यंत्रणेला जबाबदार धरले आहे.

कमलाकर झेंडे यांना कोणत्या रुग्णालयांनी नक्की कोणत्या कारणास्तव दाखल करून घेण्यास नाकारले, याबाबत चौकशी करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवडचे आयुक्तांनी दिले आहेत.

रुग्णाला परत न्या, असा फोन कुटुंबीयांना कोणी केला याबाबत तपास करण्यात येईल असे YCMH रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी म्हटले आहे. डी. वाय. पाटील रुग्णालय प्रशासनानेही कुटूंबाच्या आरोपांची चौकशी करू असे म्हटले आहे. असे सगळे असले तरी, महाराष्ट्राच्या क्रीडापटूचे उपचाराअभावी असे निधन होणे ही गंभीर बाब आहे.

kamalakar zende passed away due to rejection of two hospitals in PCMC to admit him

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात