चोरी करणारे मोकाट आणि चोरी पकडणाऱ्यांचीच चौकशी असा उरफाटा न्याय महाविकास आघाडीकडून होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्या बेताल आरोप केले आहेत. अपक्ष आमदाराला भाजपाच्या गळाला लावण्यासाठी शुक्ला प्रयत्न करीत होत्या असे त्यांनी म्हटले आहे.Jokendra Awhad’s absurd allegations against Rashmi Shukla
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चोरी करणारे मोकाट आणि चोरी पकडणाऱ्यांचीच चौकशी असा उरफाटा न्याय महाविकास आघाडीकडून होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्या बेताल आरोप केले आहेत. अपक्ष आमदाराला भाजपाच्या गळाला लावण्यासाठी शुक्ला प्रयत्न करीत होत्या असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील पोलीसांच्या बदल्यांमधील रॅकेटचा भांडाफोड गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी केला होता. शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा अहवाल त्यांनी दिला होता.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही माहिती दिली होती. रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचे पुरावेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दिल्यावर आता महाविकास आघाडीकडून शुक्ला यांच्यावरच आरोप सुरू आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की एका अपक्ष आमदाराला भाजपच्या गोटात जाण्यासाठी राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला या प्रयत्न करीत होत्या.
आव्हाड म्हणाले,अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीपासून दूर करण्याचा प्रयत्न रश्मी शुक्ला यांनी केला होता. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडी मध्ये न जाता भाजपा बरोबर राहावं यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली.
त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखिल प्रयत्न केला होता. अजून पुरावे काय पाहिजेत, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.