Jitendra Awhad Crticizes IPS Rashmi Shukla Over Phone Tapping Top Secret Report

जितेंद्र आव्हाड यांची रश्मी शुक्ला यांना उद्देशून धमकीची भाषा : पुन्हा चूक केल्यास शिरच्छेद करू!

Jitendra Awhad Press : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमध्ये ज्याचा उल्लेख होता त्या रश्मी शुक्ला यांच्या गुप्त अहवालावरून आता रणकंदन माजले आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या टॉप सीक्रेट अहवालात पोलीस विभागातील बदल्या आणि पोस्टिंगबाबत सविस्तर पुरावे देऊन भ्रष्टाचाराला वाचा फोडली. हा अहवाल बाहेर आल्यानंतर आता नवा वाद सुरू झालाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंगमधून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून बचावासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले आहेत. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. Jitendra Awhad Crticizes IPS Rashmi Shukla Over Phone Tapping Top Secret Report


विशेष प्रतिनिधी

मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमध्ये ज्याचा उल्लेख होता त्या रश्मी शुक्ला यांच्या गुप्त अहवालावरून आता रणकंदन माजले आहे. रश्मी शुक्ला यांनी आपल्या टॉप सीक्रेट अहवालात पोलीस विभागातील बदल्या आणि पोस्टिंगबाबत सविस्तर पुरावे देऊन भ्रष्टाचाराला वाचा फोडली. हा अहवाल बाहेर आल्यानंतर आता नवा वाद सुरू झालाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंगमधून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचा आरोप करत या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून बचावासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले आहेत. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

हे सरकार शिरच्छेदाची शिकवण विसरलं…

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर टीका करताना आव्हाड म्हणाले की, आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना रश्मी शुक्लांकरवी भाजपकडून संपर्क करण्यात आला होता. यावरून हे सिद्ध होतं की, त्या भाजपच्या एजंट म्हणून काम करतात. आव्हाड पुढे म्हणाले की, त्या वेळी शुक्लांवर दया दाखवण्यात आली होती. या सरकारने मन मोठे करून त्यांना माफ केलं ही चूकच झाली. शिवाजी महाराजांची शिकवण होती की, चूक झाल्यावर माफी नाही, शिरच्छेदाची शिक्षा व्हायची. हे सरकार ही शिकवण विसरलं होतं. सगळ्या चुकांनंतर रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या. माझे पती नुकतेच वारले आहेत असं म्हणाल्या, मग कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटणारच. हा सगळा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आलं नाही,” असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय.

रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट

“आतापर्यंत कुणी बोलायला तयार नव्हतं. आता बोलतील. पोलीस अधिकारी चौबे कायदा-सुव्यवस्था सहआयुक्त होते. सर्वात मोठी पोस्ट होती. ते स्वत:साठी पोस्टिंग मागतील का? त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत असतात. ते कुण्या नवाझ, इंगोलेसोबत बोलतील का? लक्षात घ्या, यांनीच माणसं प्लांट करायची, यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, यांनीच ते टेप करायचं आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचं. मला रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट म्हणून काम करतात हे सिद्ध करण्यासाठी मी यड्रावकरांसंबंधी ट्वीट केलं,” असा खुलासाही आव्हाडांनी यावेळी केला.

यड्रावकरांवर रश्मी शुक्लांचा दबाव

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर आरोप केलाय की, त्यांचा यड्रावकरांवर दबाव होता. आव्हाडांनी ट्वीट करत म्हटलं की, “शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर राहावं, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत?” असा सवाल त्यांनी ट्वीटमधून उपस्थित केलाय.

Jitendra Awhad Crticizes IPS Rashmi Shukla Over Phone Tapping Top Secret Report

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*