IPS Rashmi Shukla Top Secret Report Containce concrete evidence of posting racket, Fadnavis demands CBI probe

काय आहे IPS Rashmi Shukla यांच्या Top Secret Report मध्ये?, ठाकरे-पवार सरकार का आले अडचणीत? वाचा सविस्तर..

IPS Rashmi Shukla Top Secret Report : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी ठाकरे सरकारला टीका करत आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या एका रिपोर्टचा करून राज्यात बदली-पोस्टिंगचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप केला. IPS Rashmi Shukla Top Secret Report Containce concrete evidence of posting racket, Fadnavis demands CBI probe


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी ठाकरे सरकारला टीका करत आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या एका रिपोर्टचा करून राज्यात बदली-पोस्टिंगचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप केला.

देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलेला टॉप सिक्रेट रिपोर्ट राज्याच्या गुप्तचर विभागाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी लिहिला होता. या रिपोर्टमध्ये रश्मी शुक्ला यांनी लिहिलेय की, बदली-पोस्टिंग रॅकेटमध्ये काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर अधिकारी गुंतले होते, त्यासंबंधी पुराव्यानिशी काही फोन रेकॉर्डिंग असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काय आहे रश्मी शुक्ला यांच्या Top Secret Report मध्ये…

  • महाराष्ट्रातील गुप्तचर विभागातील आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 25 ऑगस्ट 2020 रोजी ही टॉप सीक्रेट रिपोर्ट लिहिली होती. यानुसार, महाराष्ट्र पोलीस विभागात अधिकाऱ्यांच्या पदस्थापना व बदलीसंदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असून त्यात राजकीय संबंध असलेल्या काही लोकांची नावे समोर आली आहेत.
  • या रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, “आरोप निश्चित करण्यासाठी चिन्हांकित फोन नंबरचा फोन कॉल ट्रेस करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेनंतर हे सिद्ध झाले की संशय पूर्णपणे खरा आहे. हे सर्व घडवून आणणारे काही दलाल शक्तिशाली लोकांशी संपर्क साधत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस अधिकारी ते आयपीएस या पदापर्यंतचे अधिकारी अवांछित व्यक्तींच्या संपर्कात होते.’
  • रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, 2017 मध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते, तेव्हा मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करून सात आरोपींना अटक केली होती. आता सीलबंद लिफाफ्यात फोन रेकॉर्डिंगच्या ट्रान्सस्क्रिप्टसह सविस्तर अहवाल सादर केला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण तातडीने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात यावे, असेही रिपोर्टमध्ये नमूद आहे.

 

फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर आरोप

मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी या रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टचा हवाला देऊन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या विषयावर ते केंद्रीय गृहसचिवांना भेट घेणार असून या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार आहेत. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

IPS Rashmi Shukla Top Secret Report Containce concrete evidence of posting racket, Fadnavis demands CBI probe

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*