महागाईचा फटका सामान्यांना : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ


प्रतिनिधी

मुंबई : साधारण आठवडाभरापूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर सुमारे 200 रुपयांनी उतरले असताना आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र 50 रुपयांची वाढ झाली आहे.Inflation hits common man: Rs 50 hike in domestic gas cylinder price

देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच आता इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढीमुळे भर पडली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिंलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1 हजार 52 रुपये मोजावे लागणार आहेत.



राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1 हजार 53 रुपये, कोलकातामध्ये 1 हाजर 79 रुपये आणि चेन्नईत 1 हजार 68 रुपये मोजावे लागणार आहेत.

– 5 किलोच्या सिलेंडरच्या दरात वाढ

पाच किलोच्या घरगुती सिलेंडर दरातही वाढ करण्यात आली आहे. पाच किलोच्या गॅस सिलेंडर दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली, तर 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात झाली आहे.

Inflation hits common man: Rs 50 hike in domestic gas cylinder price

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात