देशातील सर्वात मोठी तेल कंपनी IOCने सुरू केली डिझेलची होम डिलिव्हरी, आता घरबसल्या देऊ शकाल इंधनाची ऑर्डर


आता घरबसल्या डिझेल मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिल्लीस्थित स्टार्टअप हमसफर इंडियाच्या सहकार्याने अल्प प्रमाणात डिझेलची घरोघरी डिलिव्हरी सुरू केली आहे. फ्युएल हमसफर या मोबाईल अॅपद्वारे ऑफर केलेल्या सेवेने पंजाब राज्यातील पटियाला आणि मालेरकोटला या नवीन जिल्ह्यात 20 लिटर सफर 20 जेरी कॅनमध्ये डिझेलचे वितरण सुरू केले आहे. Indian Oil Corporation IOC commences doorstep diesel delivery in small quantities


वृत्तसंस्था

मुंबई : आता घरबसल्या डिझेल मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिल्लीस्थित स्टार्टअप हमसफर इंडियाच्या सहकार्याने अल्प प्रमाणात डिझेलची घरोघरी डिलिव्हरी सुरू केली आहे. फ्युएल हमसफर या मोबाईल अॅपद्वारे ऑफर केलेल्या सेवेने पंजाब राज्यातील पटियाला आणि मालेरकोटला या नवीन जिल्ह्यात 20 लिटर सफर 20 जेरी कॅनमध्ये डिझेलचे वितरण सुरू केले आहे.

सान्या गोयल, संस्थापक आणि संचालक, हमसफर इंडिया, यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी, डिझेलच्या ग्राहकांना ते किरकोळ दुकानांमधून बॅरलमध्ये विकत घ्यावे लागत होते, ज्यांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागत होता आणि कार्यक्षम ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांचा अभाव होता.

या राज्यांमध्ये उपलब्ध असेल सेवा

कंपनीने सांगितले की, ही सेवा अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना 20 लिटरपेक्षा कमी डिझेल हवे आहे. OMCच्या मते, या सेवा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, आसाम, केरळ, गुजरात, गोवा आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) नोएडा, दिल्ली, फरिदाबाद आणि गाझियाबादमध्ये उपलब्ध आहेत. गोयल म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा वापर आता त्यांच्याकडून फ्युएल हमसफर नावाचे युजर-फ्रेंडली अॅप तयार करण्यासाठी केला गेला आहे, यात कमी किमतीच्या इंधनाचा ऑर्डर सहजपणे देता येतात आणि आणि ट्रॅकिंगही करता येते.



यांना होईल फायदा

या नव्या सेवेमुळे लघुउद्योग, मॉल्स, रुग्णालये, बँका, बांधकाम स्थळे, शेतकरी, मोबाइल टॉवर, शैक्षणिक संस्था तसेच लघुउद्योगांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

आयओसीचा दुसऱ्या तिमाहीत नफा वाढला

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत IOCचा निव्वळ नफा वाढून 6,360.05 कोटी रुपये झाला आहे. ऑपरेशनच्या आघाडीवर, कंपनीने तिमाहीत चांगली कामगिरी केली, परंतु स्टोरेजवर कमी प्राप्तीमुळे नफ्यात किरकोळ वाढ नोंदवली. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने 5,941.37 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

Indian Oil Corporation IOC commences doorstep diesel delivery in small quantities

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात