महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दरमहा ३००० – ३५०० रूपयांचा विशेष भत्ता जाहीर


वृत्तसंस्था

मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी दरमहा ३००० आणि ३५०० रुपये विशेष भत्ता देण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नबाब मलिक यांनी हे विशेष भत्ते देण्याचे जाहीर केले आहे.In Maharashtra, the Thackeray-Pawar government announced a special allowance of Rs 3,000-3,500 per month for minority students

जे अल्पसंख्यांक समूदायाचे विद्यार्थी अल्पसंख्यांक डिपार्टमेंटच्या होस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहात असतील, त्या सर्वांना दरमहा ३००० रूपयांचा भत्ता दिला जाणार आहे. या विशेष भत्त्यासाठीचा सगळा निधी राज्य सरकारचे अल्पसंख्यांक खाते देणार आहे.



अ, ब आणि क वर्ग महापालिका तसेच विभागीय शहरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक रक्कम ३ हजार ५०० रुपये तर जिल्हा आणि तालुकास्तरावरील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रक्कम ३००० रुपये देण्यात येणार आहेत.

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या आहाराकरिता ही रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे ट्विट नबाब मलिक यांनी केले आहे.

In Maharashtra, the Thackeray-Pawar government announced a special allowance of Rs 3,000-3,500 per month for minority students

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात