ओमायक्रोनच्या धोक्यामुळे दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार, शिक्षण मंडळापुढे पेच; पर्यायी तोडग्याचा विचारही


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात ओमायक्रोनचा धोका हळूहळू वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून होण्याची शक्यता आहे. त्यावेळी परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. How will the written examination of class X-XII be held due to the threat of Omaikron, Problem before the Board of Education; Also the idea of ​​an alternative settlement

आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिक्षण मंडळाकडे मूल्यांकनाचा दुसरा फार्म्युलादेखील तयार असून सर्व पर्यायांची चाचपणी करूनच मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.

दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्य शिक्षण मंडळाने दहावीचे ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली. विद्यार्थी नियमित शुल्कासह २० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत २८ डिसेंबरपर्यंत आहे. विद्यार्थी बोर्डाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवरून अर्ज सादर करू शकतात.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लेखी परीक्षा न झाल्यास शिक्षण मंडळाकडे मूल्यमापनाचा दुसरा पर्याय तयार आहे. सीबीएसईप्रमाणे राज्य मंडळाने दहावी-बारावीसाठी अद्याप सेमिस्टर पद्धत अवलंबली नसली तरी शाळा स्तरावर आतापर्यंत घटक चाचणी आणि प्रथम सत्र परीक्षा झाली आहे. दुसऱ्या सत्राची परीक्षादेखील घेण्यात येणार आहे. या परीक्षा आणि वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्याचा विचार होऊ शकतो.

How will the written examination of class X-XII be held due to the threat of Omaikron, Problem before the Board of Education; Also the idea of ​​an alternative settlement

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!