अनिल देशमुख यांचा राजीनामा अटळ? होणार निवृत्त न्यायमूर्तींच्या आयोगाकडून चौकशी; संभाव्य सीबीआय चौकशी टाळण्यासाठी चाल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील आयोगामार्फत होणार आहे. राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्यामुळे देशमुख यांचा राजीनामाही अटळ असल्याचे राजकीय वर्तृळात बोलले जात आहे. त्यासाठी एक सूचक ट्विट करून देशमुखांनी वातावरणनिर्मितीही केली आहे. Home Minister Anil Deshmukh’s resignation inevitable, inquiry by retired judges


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील आयोगामार्फत होणार आहे. राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्यामुळे देशमुख यांचा राजीनामाही अटळ असल्याचे राजकीय वर्तृळात बोलले जात आहे. त्यासाठी एक सूचक ट्विट करून देशमुखांनी वातावरणनिर्मितीही केली आहे.

अनिल देशमुख यांनी रात्री बुधवारी रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी ट्विटकरत म्हटले आहे की, ‘मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, दूध का दूध, पानी का पानी करावे अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते. या संदर्भात २१ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्रही या ट्वीटसोबत देशमुख यांनी जोडले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बुधवारी रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खुद्द अनिल देशमुख यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आयोगाचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती असतील व हा आयोग लवकरच नेमण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे यांच्यामार्फत पैसेवसुलीचा गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सध्या निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करतानाच अनिल देशमुख यांचा राजीनामाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागितला आहे. फडणवीस यांची राजीनाम्याची मागणी आधीच महाविकास आघाडी सरकारने फेटाळली होती. मात्र, देशमुख यांच्या कृत्याने राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. या परिस्थितीत ते पोलीस दलाचे नेतृत्व करू शकणार नाही. त्यामुळे त्यांची चौकशी व्हावी, असे मत महाविकास आघाडीच्याच काही मंत्र्यांनी मांडले. त्यामुळे निवृत्त न्यायाधिशांमार्फत देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, चौकशीच्या वेळी पदावर असणे संकेतात बसत नसल्याने देशमुख यांना राजीनामा देणे भाग पडणार आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसोबतच सध्या फोन टॅपिंग आणि गोपनीय रेकॉर्ड लीक होण्याचे प्रकरणही गाजत आहे. त्यावर बैठकीत गंभीर चर्चा झाली व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन राज्यात गेले काही दिवस घडत असलेल्या सर्व घटनांचा अहवाल सरकारकडून मागवावा अशी मागणी केली. त्याला शह देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते व मंत्री आज राज्यपालांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Home Minister Anil Deshmukh’s resignation inevitable, inquiry by retired judges

बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*